BuldanaChikhaliVidharbha

समान्य जनता आता परिवर्तन घडविणारच : रविकांत तुपकर

चिखली (महेंद्र हिवाळे) – निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून गावखेड्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक गावात वाडीवस्तीवर सर्वसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या मनात तीव्र असा रोष दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य जनताच जिल्ह्यात परिवर्तन घडविणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चिखली तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेदरम्यान बोलताना केले. चिखली तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेला अत्यंत उत्साही प्रतिसाद मिळाला. गावागावात तुपकरांचे जंगी स्वागत करण्यात आले.

घाटाखालील चार तालुके पिंजून काढल्यानंतर आता रविकांत तुपकर यांची निर्धार परिवर्तन यात्रा घाटावर पोचली आहे. ०२ मार्च रोजी चिखली तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत झाले. घाटाखाली ज्या पद्धतीचा भरघोस प्रतिसाद या यात्रेला मिळाला त्याच तुलनेत घाटावरदेखील चिखली तालुक्यात या यात्रेला अतिशय उत्साही प्रतिसाद दिसून आला. ०२ मार्च रोजी चिखली तालुक्यातील माळशेंबा, साकेगाव, खोर, भोकर, पळसखेड दौलत, गोद्री, चांदई, मुंगसरी, खैरव, अंबाशी, उत्रादा या गावांमध्ये ही यात्रा पोहोचली. या सर्व गावांमध्ये रविकांत तुपकरांचे अतिशय जोरदार स्वागत झाले. दरम्यान रविकांत तुपकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने जिल्हाभर फिरत असतांना वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या समस्या प्रकर्षाने समोर आल्या. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित तरुण, बचत गटाच्या महिला, सर्वसामान्य मध्यमवर्गीय, व्यापारी, व्यावसायिक अशा सर्वांनाच विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी गेल्या काळात सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून कोणतेच ठॊस असे पाऊल उचलले गेले नाही, त्यामुळे आपल्या जिल्ह्यात समस्यांचा डोंगर उभा आहे. या सर्व समस्या घेऊनच ही निर्धार परिवर्तन यात्रा काढली आहे. या यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद पावलोपावली नवी ऊर्जा आणि बळ देत आहेत. हीच सर्वसामान्य जनता आता जिल्ह्यात परिवर्तन घडविणार आहे, असे यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले. यावेळी भगवानराव मोरे, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भारत वाघमारे, राम अंभोरे, अमोल मोरे, संतोष शेळके, गजानन कुटे, अरुण पन्हाळकर, अरुण नेमाने, विठ्ठल शेळके, निलेश धोंडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


खामगाव तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेचा झंझावात ; तुपकरांच्या सभांना तुफान गर्दी

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खामगाव तालुक्यातही निर्धार परिवर्तन यात्रेचा झंझावात पहावयास मिळाला. नागरिकांनी रविकांत तुपकरांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत व सत्कार करून त्यांना आपले समर्थन दर्शविले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला मिळत असलेला हा प्रतिसाद जिल्ह्यातील पुढील राजकीय भविष्य वर्तवणारा ठरत आहे. तालुक्यातील पिंप्री गवळी, कारेगाव (हिंगणा), हिंगणा कारेगाव, चितोडा अंबिकापुर, कोलरी, उमरा लासुरा, हिंगणा उमरा, संभापूर, पळशी खु., पळशी बु., कदमापूर, लोणी, दस्तापुर, शहापूर या गावांचा झंझावाती दौरा रविकांत तुपकर यांनी केला. यात्रेदरम्यान ठिक-ठिकाणी नागरिकांनी तुपकरांचे मोठ्या प्रेमाने व जोरदार स्वागत केले. यावेळी शेतकरी कष्टकरी तरुण व सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांबद्दल रविकांत तुपकर यांनी आत्मियतेने संवाद साधला. त्यानंतर पळशी बु.,कदमापूर व शहापूर येथील सभांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.


घाटाखालील चारही तालुक्यात मोठे समर्थन

गेल्या आठ दिवसांपासून रविकांत तुपकर यांचे निर्धार परिवर्तन यात्रा घाटाखाली सुरू आहे. खामगाव, शेगाव, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या चारही तालुक्यांमध्ये यात्रेला लोकांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विशेषकरून तरुणांचा रविकांत तुपकर यांना जोरदार पाठिंबा मिळतांना दिसला. एकंदरीत घाटाखालील चारही तालुक्यांमध्ये रविकांत तुपकरांच्या सभेला लोकांची गर्दी पाहायला मिळाल्याने तुपकरांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!