Head linesMarathwadaPolitical NewsPoliticsVidharbhaWorld update
मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका; विषप्रयोगाची शक्यता!
– जरांगे पाटलांवर वैद्यकीय उपचार करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून, त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, कालच मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देश जरांगे पाटलांना दिले होते. तसेच, राज्य सरकारलादेखील सरकारी खर्चाने जरांगे यांच्यावर उपचार करण्यात यावेत, असेही निर्देश न्यायपीठाने दिले होते. त्यानुसार, जरांगे यांच्यावर उपचार केले जाणार होते.
अकोल्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, की मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधे, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही लोकांपासून धोका आहे. मात्र, याच्यामागे नेमकं कोण आहे ते सांगणार नाही? जरांगे यांच्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना दिले जाणारे जेवण, औषध हे अतिशय घरातील विश्वासू व्यक्ती आणि डॉक्टरांच्या समोर दिली जावीत. मनोज जरांगे यांनी स्वतःबद्दल दक्षता आणि काळजी घ्यावी, असा सल्लाही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी जरांगे यांना दिला आहे.
————