– बुलढाणा जिल्ह्यातील इंडियन एजन्सीवाल्यांचे धाबे दणाणले!
चिखली (कैलास आंधळे) – देऊळगावराजा तालुक्यातील शिरे इण्डेन ग्रामीण वितरक देऊळगावमही येथील एजन्सी ही सिंलेडर वितरित करताना नियमबाह्यपणे ग्राहकांकडून ऐंशी ते शंभर रुपये जादा आकारत असे, तसेच ग्राहकांच्या नावावर परस्पर सिंलेडर बुकिंग करून ते दिवसाढवळ्या काळया बाजारात जादादराने विक्री करत असल्याची तक्रार अंढेरा येथील ज्ञानेश्वर म्हस्के यांनी विभागीय एलपीजी विक्री प्रमुख औरंगाबाद तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.१४ जुलै २०२३ रोजी लेखी स्वरूपात केली होती. याबाबत तब्बल सात महिने पाठपुरावा करून अखेर विभागीय एलपीजी विक्री प्रमुख औरंगाबाद यांनी सदर एंजन्सीवर एम.डी.जी अंतर्गत कार्यवाही करत पंचेचाळीस हजार आठशे एकेचाळीस रुपयांचा दंड ठोठावल्याने शिरे इण्डेन ग्रामीण वितरकाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
याबाबत अंढेरा येथील ज्ञानेश्वर म्हस्के यांनी सदर एंजन्सी ठिकठिकाणच्या ग्राहकांकडून जादा दराने सिंलेडर विक्री करत असल्याची तसेच परस्पर सिंलेडर बुकिंग करून ते दिवसाढवळ्या काळया बाजारात जादा दराने विक्री करत असल्याची तसेच ठिकठिकाणच्या गावात भर मानवी वस्तीत बोगस सीएससी आयडीच्या नावाखाली बोगस सिंलेडर विक्रीबाबत १४ जुलै २०२३रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. याबाबत इंडियन आॕईल कंपनीकडून सोमेल कुमार साहाय्य विक्री प्रमुख जळगांव यानां चौकशी अधिकारी नेमत सदर प्रकाराबाबत तपासणी केली असता, शिरे इण्डेन ग्रामीण वितरक देऊळगाव मही हे ठिकठिकाणच्या ग्राहकांकडून जादा दराने सिंलेडर विक्री करत असल्याचे ग्राहकांच्या जबबावरुन दोषी आढळल्याने तसेच देऊळगावराजा तहसीलचे पुरवठा अधिकारी चंदु इंगळे यांनी सुध्दा तक्रारीच्या अनुषंगाने देऊळगाव राजा तालुक्यातील शिरे इण्डेन ग्रामीण वितरक देऊळगाव मही एंजन्सीच्या मंडपगांव, बायगांव, सुरा, सरंबा, नागणगांव, सावखेड नागरे, चिंचखेड येथील ग्राहकांचे लेखी जबाब नोंदवले असता ठिकठिकाणी एजन्सी ग्राहकांकडून ऐंशी ते शंभर रुपये जादा घेत असल्याचे सिद्ध झाले होते. असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांच्याकडे पाठवला असता कर्तव्यदक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बस्सिये मॅडम यांनी तो अहवाल विभागीय एलपीजी विक्री प्रमुख औरंगाबाद यांच्याकडे पाठवत तात्काळ शिरे इण्डेन ग्रामीण वितरक देऊळगावमही यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल पाठवल्याने अखेर १७ जानेवारी २०२४ रोजी विभागीय एलपीजी विक्री प्रमुख औरंगाबाद यांनी सदर एंजन्सीवर एम.डि.जी अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असून, सदर एंजन्सीला पंचेचाळीस हजार आठशे एकेचाळीस रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदर कार्यवाहीने जिल्हाभरातील एंजन्सी धारकांचे धाबे दणाणले आहे. सदर कार्यवाहीचे पञ तक्रारकर्ते यांना देण्यात आले.