BULDHANAChikhaliDEULGAONRAJASINDKHEDRAJAVidharbha
नायब तहसीलदारांचा वाळूतस्करांना दणका; धडक कारवाई करत टिप्पर जप्त!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – अवैध वाळूतस्करांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या सिंदखेडराजाच्या नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर यांनी धाडसी कारवाई करीत तालुक्यातील अंढेरानजीक अवैध वाळू वाहतूक करताना एक टिप्पर पकडून दंडात्मक कारवाईसाठी अंढेरा पोलीस ठाण्यात लावल्याने रेतामाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
तालुक्यात खडकपूर्णा नदी पात्रातून दररोज शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यात येते. नायब तहसीलदार डॉ. अस्मा मुजावर या अवैध वाळू प्रतिबंधक पथकात गस्तीवर असताना त्यांना अंढेरा फाट्यानजीक एमएच-२८-एबी- ९१९९ या क्रमांकाचे टिप्पर चिखलीच्या दिशेने जाताना दिसले. त्यांनी पाठलाग करून वाहन अडवून चौकशी केली असता त्यात चार ब्रास बेकायदा वाळू आढळली. टिप्परचालक हर्षल सांडू देवकर (भानखेड) यास विचारणा केली असता सदर टिप्पर सचिन देविदास चित्ते (निमगाव गुरु) यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. सदर टिप्पर जप्त करून दंडात्मक कारवाईसाठी अंढेरा पोलिसांत जमा केले आहे. या कारवाईमुळे वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
————–