मनसे पदाधिकार्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या; खासगी अडत्यांवर गुन्हे दाखल करा!
देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – शेतमालावर एक टक्का बटाव घेणार्या व्यापार्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या चिखली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी देऊळगावराजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी देऊळगावराजा यांना निवेदन देण्यात आले.
चिखली येथील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत तिरुपती जिनिंगचे गोविंद अग्रवाल यांनी शेतकर्यांकडून घेण्यात येणार्या एक टक्का बटाव ही आमची कमाई आहे असे म्हणत जाब विचारण्यासाठी गेलेले मनसे पदाधिकारी राजेश परिहार, नारायण बापू देशमुख, प्रदीप भवर, यांच्या अंगावर परप्रांतीय कामगार पाठवून मारहाण केली. तसेच खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले. तरी खंडणीचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व शेतकर्यांची लूटमार करीत असलेल्या बेकायदेशीर खाजगी अडत व्यापार्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, शेतकर्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन देतेप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष बंडू राजे डोळस, शहर उपाध्यक्ष नवनाथ रामाणे, सचिन विधाते, आकाश डोळस, जेष्ठ नेते सहजाद भाई, श्रावण वायाळ, हर्षद हरकळ, गौरव वल्टे, अजय पवार, अशोक खरात, सचिन खरात, शरद खरात, देवा चव्हाण, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.