ChikhaliVidharbha

श्री औंढेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण

अंढेरा (प्रतिनिधी) – येथे श्री औंढेश्वर बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २००३ ला स्थापन झाली असून, आजपर्यंत पंधराशेच्यावर खातेदार असून जवळपास ५ कोटी रुपये ठेवी आहेत. साडेतीन कोटी रुपये कर्जवाटप झालेले आहे. आपल्या औंढेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला सहकार खात्यात यशस्वीपणे २१ वर्षे पूर्ण झाल्याने संचालक मंडळाने नवीन वर्षी परिसरातील गोरगरीब जनतेसाठी एक नवीन रुग्णवाहिका ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर अंढेरासह परिसरातील रुग्णसेवेसाठी सेवा उपलब्ध करून दिली आहे. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच थाटात झाले.

या रूग्णवाहिका लोकार्पणच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव सानप (भाऊसाहेब) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती समाधान पाटील शिंगणे, उपसभापती दादारावभाऊ खार्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंढे, संस्थापक अध्यक्ष भगवानराव सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. रुग्णवाहिकेचे लोकार्पण अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विकास पाटील यांनी फित कापून केले. यावेळी कार्यक्रमामध्ये नियमित खातेदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक भास्करराव तेजनकर यांनी तर सूत्रसंचलन विष्णू बनकर यांनी केले. यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अशोक पवार, उपाध्यक्ष गजानन नागरे, उमेश दंडे, संजय गायकवाड, रमेश इंगळे, शेख रफिक शेख शरीफ, सुभाष राठोड, मोतीराम बडगे, हे संचालक तर मीणा सानप, रुख्मिणी तेजनकर ह्या संचालिका उपस्थित होत्या. तसेच विजय इंगळे लिपिक, रोखपाल सतिश सानप, बल्पबचत प्रतिनिधी गोपाल दळवी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर रुग्णवाहिकेची सेवा २४ तास उपलब्ध असून ९४२३२३९७९१ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन पतसंस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!