देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – समाजात आजही मुलाकडे वंशाचा दिवा म्हणून पाहिल्या जात असले तरी मृत्यूनंतर आई-वडिलाच्या पार्थिवाला अग्निडाग, पाणी पाजण्याचा अधिकारही मुलालाच; असा ग्रामीण भागातील समज हळुहळू दूर होत आहे. तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील साहेबराव रामराव बंगाळे (वय ७०) यांचे रविवारी (दि.२८) वृध्दापकाळाने निधन झाले. बंगाळे यांना मुलगा नसल्याने त्यांची विवाहित मुलगी कमल टेकाळे यांनी वडिलास पाणी पाजण्यासोबत त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग देऊन आपले कर्तव्य पार पाडले.
मुलगा हाच वंशाचा दिवा हा बुरसटलेला विचार सोडून मुलगीदेखील वंशाची पणती आहे, हा विचार साहेबराव बंगाळे यांच्या दोन्ही मुलींनी रूजविला आहे. साहेबराव बंगाळे यांच्या पश्चात मंदोधरी व दुर्गाबाई अशा दोन पत्नी आहे. दोघींनादेखील मुलगा न झाल्याने त्यांना कमल व शारदा अशा मुली झाल्या आहेत. कमलचे पती पुणे येथे कंपनीत नोकरीला आहे. आपला संसार संभाळत तेथून येऊन त्या संभाजीनगर येथील दवाखाना करून परत जात असे. अशी कसरत गेली तीन ते चार महिन्यापासून करत पित्याच्या दवाखान्याची जवाबदारी स्वीकारली. बंगाळे दांपत्यांनीसुद्धा मुलगा नसल्याची खंत व्यक्त केली नाही, आणि दोन्ही मुलींनीसुद्धा सुख दुःखात धावत येऊन म्हणार्या आईवडिलांच्या अडचणी सोडवल्या. या मुलींच्या कर्तव्यतेने मुलगी हीच वंशाची पणती होऊ शकते, हा विचार समाजात रूजण्यात महत्व प्राप्त झालेले आहे.
बुलढाण्याचे राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यावर!