– पहिल्या टप्प्याचे आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन; दुसऱ्या टप्प्यातील चार कोटी बत्तीस लाखाच्या कामांना मान्यता
मेहुनाराजा/ बुलढाणा (संजय निकाळजे) – जिल्ह्यातील मेहुनाराजा येथे जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने संत चोखामेळा जन्मोत्सव रविवारी (दि.14) पार पडला. यावेळी सकाळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांच्या हस्ते महापूजा व आरतीने या सोहळ्याला सुरुवात होऊन संत चोखामेळा यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संत चोखामेळा जन्मस्थळाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेला साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, यातील पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यातील चार कोटी बत्तीस लाखांच्या कामांना मान्यता मिळालेली आहे.
पश्चिम विदर्भातील मेव्हणाराजा हे संतपीठामध्ये अग्रस्थानी आहे. येथील संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाच्या विकासासोबत हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी केल्या अनेक वर्षापासून होती. त्याला यावर्षी शासनाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला असून जन्मस्थळाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेला साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आ. डॉ. शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यातील चार कोटी बत्तीस लाखाच्या विविध प्रशासकीय कामांना मान्यता देण्यात आली असून हा निधी प्राप्त झाल्यानंतर या कामांना सुरुवात करणार येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले. यावेळी अध्यक्षस्थानी संत चोखामेळा यांच्यावर संशोधन करणारे इतिहास संशोधक प्रा. कमलेश खिल्लारे होते. यावेळी प्रा. खिल्लारे यांनी संत चोखोबा यांचा जन्मोत्सव लोकोत्सव व्हावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला राका प्रदेश सरचिटणीस डॉ. रामप्रसाद शेळके, एल एम शिंगणे, राजीव शिरसाठ, शिक्षणाधिकारी प्राथमिक बि.आर. खरात, गटशिक्षणाधिकारी मुकेश माहूर, उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम बालाजी कापरे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, केंद्रप्रमुख बबनराव कुमठे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जाधव, तालुका आरोग्य अधिकारी उबाळे, पशुधन विकास अधिकारी डॉ संदीप उदार यांच्यासह सरपंच मंदा बोंद्रे, उपसरपंच साहेबराव काकडे यांची सकाळी महापूजेसाठी प्रमुख उपस्थिती होती. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त माजी आ डॉ शशिकांत खेडेकर, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, माजी आ.हर्षवर्धन सपकाळ, माजी तोताराम कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर ही मान्यवर मंडळी आधीच दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधी स्थळी येऊन दर्शन घेतले. तर सकाळी सूर्योदयास संत चोखोबा महाराजांची महापूजा पार पडली. यावेळी जिल्हा परिषद तसेच तालुका पातळीवरील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सोहळ्याला माजी जि प उपाध्यक्ष गंगाधर जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती समाधान शिंगणे, गजानन पवार, गणेश सवडे, राजू शिरसाठ, राजू चित्ते, ग्रामसेवक मदन वायाळ यांचेसह परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.