Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

शेतकर्‍यांची मुलुखमैदानी तोफ शनिवारी मिसाळवाडीत धडाडणार!

– पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजूर, युवावर्गाने मोठ्या संख्येने ‘रविभाऊं’चे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

चिखली (कैलास आंधळे/महेंद्र हिवाळे) – शेतकर्‍यांच्या न्यायहक्कासाठी छातीवर पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलून वेळप्रसंगी जेलमध्येही जाणारे व शेतमालाला भाव मिळवून देणारे, शेतकर्‍यांचे पंचप्राण, शेतकरी चळवळीची मुलुखमैदानी तोफ येत्या शनिवारी (दि.१३) राज्याला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नामवंत जन्माला घालणार्‍या मिसाळवाडी गावात धडाडणार आहे. सर्व राजकीय पक्षात सक्रीय असलेल्या शेतकरी लोकनेतृत्वांसह मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळ, पिंपळवाडी, अंचरवाडी, देऊळगाव घुबे या गावांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रविकांत तुपकरांच्या या भव्य सत्कार व जाहीर सभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती मिसाळवाडीचे सरपंच विनोद तथा बाळू पाटील व उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी दिली आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लढणारे राज्यातील एकमेव नेते म्हणजे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आहेत. त्यांच्या विविध आंदोलनामुळेच शेती-मातीत कष्ट करून राबराब राबणार्‍या शेतकर्‍याला रखडलेला पीकविमा, शेतीपिकांची नुकसान भरपाई, व शेतीपिकांना भाव मिळाला आहे. शेतमालाला भाव व पीक नुकसानीसाठी तुपकरांचा अजूनही सरकारशी लढा सुरूच आहे. शेतकर्‍याच्या घरात जन्माला आलेल्या व शेतकर्‍यांसाठी वेळप्रसंगी जेलमध्येही जाणार्‍या या शेतकरी नेत्याला आगामी निवडणुकीत लोकसभेत पाठविण्याचा निर्धार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी, शेतमजूरांसह तमाम जिल्हावासीयांनी केलेला आहे. या शेतकरी नेत्याला लोकसभेच्या लढाईत यश येवो, ‘राजवाडाविरुद्ध गावगाड्याची’ लढाई त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने जिंकावी, यासाठी मिसाळवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या संत गजानन महाराजांना साकडे घालण्यासाठी, तसेच त्यांचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने जाहीर सत्कार करून त्यांचे विचार ऐकण्यासाठी शेतकरीपुत्र असलेल्या परंतु विविध राजकीय पक्षात सक्रीय असलेल्या लोकनेतृत्वाच्या मित्रांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शेतकरी नेते भानुदास घुबे, अंचरवाडीचे सरपंच समाधान परिहार, इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच विनोद तथा बाळू मिसाळ पाटील, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र ग्रूप’चे मुख्य संपादक तथा राज्यातील ज्येष्ठ पत्रकार, उद्योजक पुरूषोत्तम सांगळे, माजी सरपंच देविदास मिसाळ, पिंपळवाडीचे युवा नेते राहुल मिसाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम अभूतपूर्व व्हावा, यासाठी मिसाळवाडीचे उपसरपंच हनुमान मिसाळ, मिसाळवाडीचे भूमिपुत्र तथा आदर्श मुख्याध्यापक प्रवीण सुधाकर मिसाळ, सुभाष शिनगारे, जगदेव सुरडकर, युवा नेते सुनील मिसाळ पाटील, संतोष भगत, किशोर सुरडकर, अनिल काकडे, शशिकांत लक्ष्मण मिसाळ, कृष्णा शंकर सांगळे, प्रसाद अशोक मिसाळ, योगेश दत्तू भगत, गणेश देवीदास मिसाळ, श्याम आत्माराम भगत, गणेश काशीनाथ कोलते, नंदू अंबादास शिनगारे, परशराम सुरडकर, विकास सुरडकर, पवन विजय शिनगारे, पवन गणेश सांगळे, गोपाल भगत, शुभम लिंबाजी मिसाळ, अक्षय सतिश भगत, गजानन सुरडकर, सुनील शिनगारे, बळीराम देवीदास मिसाळ, अशोक पुरूषोत्तम भगत, अमोल गुलाबराव भगत, हनुमान विष्णू मिसाळ, राहुल काकडे, गजानन मिसाळ, योगेश मिसाळ, गजानन झाल्टे आदींसह गावातील युवावर्ग मोठ्या जोमाने कामाला लागला आहे.


रविकांत तुपकर काय बोलणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष!

लोकसभा निवडणूक महिना-दीड महिन्यावर आली असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी नेते रविकांत तुपकरांची जिल्ह्यातील पहिलीच सभा चिखली तालुक्यातील मिसाळवाडी गावात होत आहे. या सभेतून ते निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. या सभेतून तुपकर या बोलणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. मिसाळवाडीसह परिसरातील शेळगाव आटोळ, पिंपळवाडी, देऊळगाव घुबे, इसरूळ, मंगरूळ, अमोना, कोनड, अंचरवाडी येथील शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते, शेतकरी ग्रामस्थ स्त्री-पुरूषदेखील या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने मिसाळवाडीच्या युवा नेत्यांनी या कार्यक्रमाची जोरदार तयारी चालवली आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!