Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

आरपीएफचा दलालांना दणका, 128 जणांना अटक, 64.61 लाख रूपये किमतीची तिकिटे जप्त

– तब्बल २८५० तिकिटे रेल्वे सुरक्षा दलामार्फत करण्यात आली जप्त

सोलापूर (हेमंत चौधरी) – मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने (RPF), रेल्वे आरक्षण तिकिटांच्या काळाबाजार करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी आणि प्रवाशांचे हित प्रामाणिकपणे जपण्यासाठी दलालांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. सायबर सेलकडून मिळालेल्या माहिती आणि इतर बाबींच्या आधारे मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने छापे टाकले. या छापेमारीत प्रामुख्याने मुंबई विभागातील खासगी ट्रॅव्हल्स एजन्सींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. एकूण 128 दलालांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 64.61 लाख रूपये किमतीची तिकिटे जप्त करण्यात आली आहे. एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली असून, कारवाईचे हे सत्र सुरूच आहे.

Mumbai: RPF to distribute manual among staffers on how to use weapons safelyनोव्हेंबर २०२२ मध्ये अशाप्रकारची ८ प्रकरणे होती तर त्याच तुलनेत नोव्हेंबर २०२३ मध्ये रेल्वे सुरक्षा बल, मुंबई विभागाने रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत दलालीच्या एकूण १० प्रकरणांचा छडा लावला. उपरोक्त कायद्यांतर्गत ११ जणांना अटक करण्यात आली आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये या दलालांकडून ३,७८,७४७ रुपये किमतीची १७९ तिकिटे जप्त करण्यात आली. एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दलालीचे ९६ गुन्हे दाखल करून ११५ जणांना अटक करण्यात आली, त्याच तुलनेत चालू वर्षात एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये दलालीचे १०७ प्रकरणे नोंदवण्यात आली आणि १२८ जणांना अटक करण्यात आली. एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एकूण २८५० तिकिटे जप्त करण्यात आली असून ६४,६१,२०३ रूपये इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली आहे, तर एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत ३२८० तिकिटे आणि ६२,१५,१८८ रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाच्या आयटी सेल कर्मचारी आणि कौशल्य विकास केंद्राची एक टीम PRABAL आणि त्या सारख्या इतर विविध सॉफ्टवेअरने सुसज्ज ई-टाउटिंग तपास करणे, सायबरस्पेस मार्फत पाळत ठेवणे, सीसीटीव्ही द्वारा निरीक्षण इ. मध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत एजंट किंवा दलालांकडून तिकीट खरेदी करू नये कारण यामुळे प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि आपल्याला मोठा दंड बसू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!