बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारी श्री साई बाबा बहुउद्देशिय क्रिडा, शिक्षण संस्था, बुलडाणा व अली यावर जंग राष्ट्रीय वाक एवं श्रवण विकलांग इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ जुलै रोजी भव्य मोफत श्रवणदोष तपासणी व श्रवण यंत्र वाटप शिबिराचे आयोजान खामगांव रोड स्थित सेंट जोसेफ शाळेनजीक असलेल्या आस्था मतिमंद विशेष विद्यालय करण्यात आले आहे.
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणाऱ्या कर्णबधीर रुग्णांना निशुल्क सेवा व कर्णयंत्र प्रदान करणे हा या शिबीरामागील उद्देश आहे. १ ते १२ वर्ष वयोगटामधील ज्या रुग्णांनी किमान १ वर्ष व १२ वर्षापुढील ३ वर्ष शासकीय योजनेच्या माध्यमातून लाभ न घेवू शकलेल्या रुग्णांना कर्णयंत्र प्रदान केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य कर्णदोषी रुग्णांना होणारा त्रास बघता त्यांना निशुल्क उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेले हे शिबीर २७ व २८ जुलै या दोन दिवशी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत खामगांव रोड स्थित सेंट जोसेफ शाळेनजीक असलेल्या आस्था मतिमंद विशेष विद्यालय येथे पार पडणार आहे. साईबाबा बहुउद्देशीय क्रिडा-शिक्षण संस्थेकडून असे समाजोपयोगी उपक्रम नेहमी राबवले जातात ज्याचा फायदा असंख्य गरजू तथा गरीब रुग्णांना होत असतो. या श्रवणदोष तपासणी व श्रवणयंत्र शिबीरात सहभागी होण्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, २ पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच शिबीरात सहभागी होणाऱ्या रुग्णांनी पूर्वनोंदणी करण्यासाठी मोहन बंगाले ९८५००४३३७९, संजीव आराख ९८५०७५२६०३ व राजेश जाधव ७३८७७७२२२५, यांच्याशी संपर्क करण्याचे आणि गरजूंनी शिबीरात उपस्थित राहण्याचे आवाहन संजीव आराख, शेषराव हिवाळे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.(श.प्र)