संयुक्त अरब अमिरात येथील अंगावर शहारे आणणारी घटना; महिलेच्या डोळ्यासमोर वाहून गेले दोन मुले व पती!
सांगली (ब्रेकींग महाराष्ट्र) – पावसाळ्याचा आनंद लुटतांना तसेच सेल्फी काढून सोशल मिडीयावर टाकण्याचे अनेक शौकीन आहेत. तर काही जीवघेणा स्टंटबाजी करुन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. तो त्यांचा आखरीचा फोटो असेल यांची त्यांना पुसटशी कल्पनाही नसते, असाच प्रकार महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत येथील म्हमाणे कुटुंबीयांवर ओढावला आहे. शशिकांत उर्फ विजय म्हमाणे हे संयुक्त अरब अमिरात येथील ओमान समुद्रावर फिरायला गेले होते, त्यावेळी अचानक मोठी लाट आली अन् शशीकांत आपल्या दोन मुलासह समुद्रात वाहून गेल्याची दुदैवी घटना घडली.
संयुक्त अरब अमिरात येथील ओमान समुद्रामध्ये सांगली येथील जत मधील तिघे जण वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याबाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुळचे जत येथील असणारे अभियंता शशिकांत म्हमाणे व त्यांचा 1 मुलगा व 1 मुलगी असे तिघेजण समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेल्याचा हा प्रकार ओमान इथे घडला आहे. घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, अंगावर शहारे आणणारे फोटो जत येथील प्रसिद्ध वकील राजकुमार म्हमाणे यांचे बंधू शशिकांत उर्फ विजय म्हमाणे हे संयुक्त अरब अमिरात येथील येथे एका कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत असून यामुळे पत्नी व तीन मुलांच्यासह त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. रविवारी ईदची सुट्टी असल्याने ते आपले कुटुंब व मित्रांसमवेत ओमान या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी बनवून, आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता.
पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीसह दोन मुले वाहून गेली..
सांगली येथील शशीकांत म्हमाणे हे कुटुंब संयुक्त अरब अमिरात ओमान येथील समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी प्रचंड लाटा उसळत होत्या. त्याचा व्हीडीओ सुरु असताना अचानक एक प्रचंड मोठी लाट आली आणि त्यामध्ये शशीकांत म्हमाणे, मुलगा श्रेयस व मुलगी श्रुती हे तिघे जण वाहून गेले. हे सर्व दृश्य शशीकांत यांच्या पत्नी पाहत होत्या. यामध्ये सारीका व त्यांची एक मुलगी बचावली आहे. एकाच कुटुंबातील तीघे जण वाहून गेल्याने म्हमाणे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.