BULDHANAHead linesVidharbha

देऊळगावमही येथील कोट्यवधींची सरकारी जमीन भूखंडमाफियांच्या घशात!

चिखली/देऊळगावराजा (कैलास आंधळे) – देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही येथील केंद्रीय महामार्ग ७५३/ए खडकपूर्णा वसाहतीसमोरील सरकारी जमिनीवर भूखंडमाफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून, कोट्यवधींची ही शासकीय जमीन घशात घातली असताना महसूल प्रशासन मात्र डोळ्यावर गेंड्याची कातडी ओढून झोपी गेले आहे. संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, देऊळगावराजा तहसीलदारदेखील या भूखंडमाफियांना सामील आहेत का? असा संतप्त सवाल निर्माण होत आहे. हे अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.

देऊळगावमही येथील खडकपूर्णा वसाहत ही चिखली-जालना रोडवर असून, या वसाहतीसमोर असलेला शासकीय भूखंड देऊळगावमही गावातील काही भूखंडमाफियांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतला आहे. आजरोजी या भूखंडाची किंमत कोट्यवधी रूपये आहे. या सरकारी जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणधारकांची मुजोरी वाडलेली आहे. तरी अश्या मुजोरांना मुसक्या घालण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि सरकारचे कोट्यवधी रूपयांचे होणारे नुकसान थांबावे, अशी मागणी परिसरातून पुढे आली आहे. या संदर्भात देऊळगावमही येथील जुनेद कुरेशी यांनी ऑनलाइन तक्रार देऊन वरिष्ठांना कळविले आहे.

देऊळगावमही हे गाव राजकीय गाव आहे, येथील पुढार्‍यांनी आपले राजकीय वर्चस्व स्थापित करायचे असल्याने आतापर्यंत सरकारी जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात त्यांती तोंड बंद ठेवलेले आहे. तेव्हा शासनाने तातडीने अंमलबजावणी करून त्या जमिनीवरील अतिक्रमण काढून त्या अतिक्रमण करणार्‍या भूखंडमाफियांवर सरकारी जमीन हडपन्याचे गुन्हे दाखल करून जेरबंद करावे, आणि सरकारने ही जमीन आपल्या ताब्यात घ्यावी, असे देऊळगावमही येथील जुनेद कुरेशी यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी बुलढाणा, सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना केलेल्या मेलमध्ये नमूद आहे. विशेष बाब म्हणजे, हे अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी गावाचे तलाठी व तालुक्याचे तहसीलदार यांची आहे. तलाठी व तहसीलदार कसे काय मूग गिळून बसलेत, याबाबत परिसरात शंकाकुशंका व्यक्त होत असून, या दोघांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही पुढे आली आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!