शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आजपासून राज्यात झंझावात!
– पक्षांचे झेंडे बाजूला ठेवत शेतकर्यांसाठी केले एकीचे आवाहन!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – सोयाबीन तसेच कपाशी नुकसानीची एकेरी सरसकट दहा रूपये मदत द्यावी, यासह विविध रास्त मागण्या शासन दरबारी रेटण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आज (दि.२५)पासून राज्याचा दौरा करणार आहेत. यामध्ये आज उपराजधानी नागपूरला पत्रकार परिषदेने पहिल्या टप्याचा झंझावात सुरू झाला आहे. शेतकर्यांसाठी पक्षाचे झेड़े बाजूला ठेवत एक होण्याचे आवाहन करण्यात केले आहे.
यंदा पाऊस बरसला नसल्याने व त्यातच येलो मोझॅकने नगदी पीक सोयाबीनला घेरल्याने एकरी दोन ते तीन पोते उतारा आला. बोंड़अळीने कपाशीला फस्त केले आहे. त्यामुळे खर्चही वसूल झाला नाही. त्यातच शासनाची मदत निकषात अड़कत असल्याने शेतकर्यांना मदत अथवा पीकविमा मिळण्यासाठी अड़थळ्याची शर्यत पार करावी लागणार आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वृत्ताची दखल घेत व रविकांत तुपकरांनी मागणी रेटल्यानंतर सोयाबीन नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले, पण अर्धीअधिक सोयाबीनची काढणी झाल्याने पुढे काय झाले, हे शेतकर्यांना काहीच समजले नाही. त्यामुळे शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आताही सरसावले असून, सोयाबीन व कपाशीच्या नुकसानीची एकरी दहा हजार रूपये सरसकट मदत द्यावी, कपाशी व सोयाबीनची भाववाढ करावी, पीकविमा त्वरीत मंजूर करावा, यासह विविध शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यासाठी विदर्भातील राज्याची उपराजधानी नागपूर येथील प्रेस क्लब सिव्हिल लाईन येथे दुपारी पत्रकार परिषद घेऊन पहिल्या टप्प्यातील दौरा सुरू झाला आहे. आजच दुपारी ३ वाजता वर्धा येथील शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी बैठक घेणार असून, ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ येथील विश्रामगृह येथे शेतकरी बैठक व १२ वाजता पत्रकार परिषद घेणार असून, अमरावती येथील विश्रामगृह येथे दुपारी ३ वाजता शेतकरी बैठक व दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. २७ ऑक्टोबररोजी अकोला येथील विश्रामगृह येथे दुपारी १२ वाजता शेतकरी बैठक घेणार असून, दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. २८ ऑक्टोबररोजी लातूर येथील विश्रामगृह येथे दुपारी १२ वाजता शेतकरी बैठक घेणार असून, दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. २९ ऑक्टोबररोजी दुपारी १२ वाजता बीड़ येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेणार असून, सायंकाळी ७ वाजता ताड़सोन्ना जि.बीड़ येथे सोयाबीन-कापूस एल्गार परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. ३० ऑक्टोबररोजी बुलढाणा येथील विश्रामगृह येथे दुपारी १२ वाजता शेतकरी बैठक घेणार असून, सायंकाळी ७ वाजता हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खोड़के ता.सेनगाव येथे कापूस-सोयाबीन एल्गार परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. तरी शेतकर्यांसाठी पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.