Head linesLONARVidharbha

धारतीर्थ स्नानासाठी खुले करा, अन्यथा सविनय कायदेभंग करू – डॉ. गोपाल बछिरे

लोणार (उद्धव आटोळे) – नवरात्रापासून धारतीर्थ तीर्थस्नानासाठी खुले करा नसता सविनय कायदेभंग करू, असा इशारा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी जिल्हाधिकारी तथा पुरातत्व शास्त्र विभागास दिला.

निवेदनात लोणारचे विरजधारतीर्थ ज्यास दक्षिणकाशी अशी उपमा दिलेली आहे आणि या धारतीर्थावर येणाऱ्या लोकांना आंघोळीसाठी घरी पाणी नाही म्हणून येत नाही तर ते श्रद्धास्नान करण्यासाठी येतात,श्रद्धा स्नान केल्याने माणसाच्या तनावरचा नव्हे तर मनावरचा मळ स्वच्छ होतो आणि माणूस पवित्र झाल्याचे अनुभवतो हा विश्वास आहे या धारतीर्थावर श्रद्धास्नान करण्यासाठी महाराष्ट्रतून नव्हे तर देशातून श्रद्धाळू येतात,या श्रद्धाळू,पर्यटकांच्या येण्यामुळे आमच्या लोणार नगरीचा व्यापार उद्योग चांगल्या स्थितीत चालत आहे जर येथे श्रद्धाळू व पर्यटक येणे बंद झाले तर आमच्या लोणारची अर्थव्यवस्था जी 4 वर्षानंतर रुळावर आली होती ती डबघाईला गेली आहे सदरील लोणारचे धारातीर्थ हे पुरातत्त्व विभागाच्या मालकी हक्काचे नसून हे गंगा भोगावती नावाने महसूल विभागाच्या नोंदीमध्ये आहे . लोणारी येथील विरज धारतीर्था विषयी निकाल सन 1944 य.मा. काळे यांनी दाखल केलेल्या याचिका क्रमांक 484 नुसार उच्च न्यायालयाने दिलेला आहे, त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, “सदरील धारातीर्थ हे हिंदूंच्या मालकीचेच प्राचीन तीर्थस्थान आहे” असे असतानाही आपण उच्च न्यायालयाचा अवमान करून श्रद्धातीर्थ तीर्थस्नानासाठी बंद करण्यात आले आहे. आपल्या म्हणण्यानुसार धारातीर्थावर होत असलेल्या गर्दीमुळे तेथील दगडांची झीज होत आहे व त्या कारणाने तूम्ही 17 सप्टेंबर रोजी धारतीर्थ तीर्थ स्नानासाठी बंद केले आहे, जर तीर्थक्षेत्र आणि पर्यटन हे पर्यटकांच्या येण्या जाण्याने झिजत असतील तर आग्र्याचे ताजमहल, दिल्लीचा लाल किल्ला, अजिंठयाची लेणी,एलोरा येथील कैलास लेणे, बनारस चे काशीतीर्थ, अयोध्याचे नवनिर्मित राम मंदिर, बद्रीनाथ, केदारनाथ सहित सर्व तीर्थक्षेत्र बंद करा, आणि त्यानंतरच लोणारचे पावन विरजधारातीर्थ बंद करण्याविषयी विचार करा. 14 ऑक्टो.पासून नवरात्र उत्सव सुरू झाले आहे व नवरात्रात धारतीर्थाचे श्रद्धास्थान हे आमच्या हिंदू धर्मासाठी फार महत्त्वाचे व पवित्र मानले जाते व व आम्ही स्वातंत्र्य हिंदू देशात राहतो का यमन देशात राहतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या नवरात्र उत्सवात लाखो हिंदू भावीक धारतीर्थावर श्रद्धा स्नान करण्यासाठी येतात धारतीर्थ श्रद्धास्नानासाठी खुले करावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व लोणार पंचकृषीतिल सामान्य नागरिक तीव्र आंदोलन छेडून येत्या 22 ऑक्टोबर 2023 रोजी “जसे भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे गांधीजींनी केले तसेच धारतीर्थाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही सर्व हिंदू सुद्धा सविनय कायदेभंग करून धारातीर्थ स्वतंत्र करू”असा इशारा बुलढाणा जिल्हा संघटक डॉ.गोपाल बच्छिरे यांनी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत,बुलढाणा जिल्हा उपप्रमुख प्रा.अशिषभाऊ रहाटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक यांना देण्यात आला आहे. याप्रसंगी शिवसेना उ.बा.ठा.चे नेते अड दीपक मापारी गजानन जाधव सर , श्याम राऊत, सय्यद उमर, लुकमान कुरेशी, किसन आघाव, कैलास अंभोरे, श्रीकांत नागरे, जीवन घायाळ, तानाजी मापारी, सुदन अंभोरे, श्रीकांत मादनकर,इकबाल कुरेशी,गोपाल मापारी, सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!