Head linesLONARVidharbha

बेईमानांच्या जगात बळीराजाने इमानदारी दाखवली; खात्यात आलेली १५ लाखांची रक्कम परत केली!

– पडताळणीसाठी स्वतः बँक गाठली, व पैसे परत घेण्याची विनंतीही केली!

लोणार शहर (विजय गोलेछा) – लोणार तालुक्यातील गंधारी येथील युवा शेतकर्‍याच्या बुलडाणा अर्बन बँकेच्या खात्यात अचानक आलेले १५ लक्ष ७६ हजार ८५ रुपये जमा झाल्याने देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सदर रक्कम टाकली की काय, हे पाहण्यासाठी गंधारी येथील राधेश्याम बाला चव्हाण हे लोणार येथील बुलडाणा अर्बन बँकेमध्ये गेले असता, शाखेचे व्यवस्थापक यांनी सदर रक्कम चुकीने तुमच्या खात्यात जमा झाल्याचे सांगितल्यावर या युवा शेतकर्‍याने तात्काळ आपल्या खात्यात जमा झालेली १५ लक्ष ७६ हजार ८५ रुपये संबधित खातेदाराच्या खात्यात जमा करून दिल्याने जगाचा पोशिंदा म्हणून असलेल्या बळीराजांने अखेर आपला प्रामाणिकपणाचे प्रत्यक्ष उदाहरण समाजापुढे मांडले आहे. या प्रामाणिकतेमुळे बुलढाणा अर्बन लोणार शाखेच्यावतीने व शिवछत्र मित्र मंडळाच्यावतीने या शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी, बुलडाणा अर्बन बँकचे लोणार शाखेचे व्यवस्थापक गोपाल सावळे, राजेश शर्मा, अरुण गीते, पांडुरंग मुंढे, मधुकर सातपुते सुरेश जाधव, तुकाराम डोळे, यासह मान्यवर उपस्थित होते.

एकीकडे ग्राहकाच्या बँक खात्यातील रक्कम ऑनलाइनने परस्पर काढून ती लंपास करण्याचे प्रमाण वाढत असतांना दुसरीकडे मात्र बँक खात्यात अचानक आलेले पैसे आपले प्रामाणिकपणाने परत केल्याचा प्रकार लोणार येथे पहायला मिळाला आहे. सदर रक्कम बुलडाणा अर्बन बँकेच्या औरंगाबाद व्यवस्थापकाकडून औरंगाबाद येथील दिशा लोहारिका इंप्रâास्ट्रक्चरचे १५ लक्ष ७६ हजार रूपयांचा आरटीजीएस करत असतांना सदर व्यक्तिस बँकेचे आय.एफ.सी.कोड आणि ब्रँच कोड ९३ एवजी चुकिने लोणार शाखेचे ३९ दिल्याने १५ लक्ष ७६ हजार ८५ रूपये गंधारी येथील राधेश्याम चव्हाणच्या खत्यात २० ताखेला जमा झाले. एवढी मोठी रक्कम आपल्या खात्यात कशी काय आली आहे हे विचारण्यासाठी राधेश्याम चव्हाण हे बँकेच्या लोणार शाखेत गेले असता, यावेळी व्यवस्थापक गोपाल सावळे यांनी त्यांना सदर रक्कम ही दिशा लोहारिका इंप्रâास्ट्रक्चरच्या छत्रपती संभाजीनगर येथील बुलडाणा अर्बन बँकच्या खाते क्रमांक २१/ ६६३ मध्ये जमा करायची होती. मात्र ती तांत्रिक चुकिने लोणार शाखेच्या खाते क्रमांक २३/ ७४५९ मध्ये जमा झाल्याचे सांगितले. तेव्हा राधेश्याम चव्हाण या शेतकर्‍याने सदर रक्कम परत करीत जगाचा पोशिंदा असणार्‍या बळीराजासमोर अनेक नैसर्गिक आपत्ती आल्यानंतरही आपल्या प्रामाणिकपणाचे आदर्श उदाहरण समाजापुढे मांडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!