ChikhaliVidharbha

लाखनवाडा -उदयनगर मार्ग दुरुस्त होणार तरी कधी?

उदयनगर, ता.चिखली (जिया काझी) – येथून जवळच असलेल्या लाखनवाडा गावातील बस थांब्यापासून उदयनगर रस्त्याची आजही दुरवस्थाच आहे. जागोजागी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. लखनवाडा गावातील रस्त्यावर पाणी साचल्याने व पावसामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महावितरणचे खांब रस्त्याच्या मधात असल्या कारणाने रस्त्याचा काम रखडले असून येणार्‍या १५ दिवसात काम सुरू करण्यात येईल.
– जितेंद्र काळे, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.


लाखनवाडा हे गाव खूप मोठे असून, उदयनगर ते अकोला जाण्या-येण्यासाठी सोईस्कर असून, या मार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
– सुनिता खंडारे, सरपंच, लाखनवाडा.

रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, कंत्राटदार विशेषत: संबंधित अधिकार्‍यांना वेळोवेळी बोलून पण रस्ता सुधारला नाही. रस्ता बांधकामाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने महावितरण कंपनीचे खांबाचा कारण दाखवत असल्याची माहिती रस्त्याशी संबंधित अधिकार्‍यांकडून देण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जितेंद्र काळे यांना सांगितले असता, दहा ते पंधरा दिवसात लाखनवाडा गावाचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले. सर्व संबंधित विभाग एकमेकांकडे बोट दाखवायच काम करत आहेत. याला कोणते सरकारी प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार आहेत? हे कळेनासे झाले आहे. या रस्त्याचे काम तातडीने न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!