Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

जिजाऊ, शिवरायांच्या घोषणांनी व्यापणार बुलढाण्याचे आसमंत!

बुलढाणा (गणेश निकम) – सकल मराठा क्रांती मोर्चाची भूमिका पूर्वीप्रमाणे यंदादेखील संयमी राहणार आहे. इतर घटकांचा आदर करीत आपली रास्त मागणी संविधानिक मार्गाने मराठा मोर्चातून मांडली जात आहे, मात्र संयमाचा कडेलोट होत असल्याने १३ सप्टेंबरच्या मोर्चात यावेळी घोषणांचा पाऊसदेखील पडणार असल्याने बुलढाण्याचे आसमंत दुमदुमून जाणार आहे. आरक्षणासाठी हुंकार भरला जात असून, मोर्चाची वेळ जवळ येत आहे. तसे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात उपोषण, निवेदन देऊन सामाजिक पाठिंबादेखील दर्शविला जात आहे.

बुलढाणा येथे मराठा आरक्षणासाठी यापूर्वीदेखील क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. लाखो समाज बांधव त्यात सहभागी झाले. हीच स्थिती राज्यभर होती. मात्र तेव्हापासून आजतगायत मराठा आरक्षणाचा तिढा सुटू शकला नाही. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी जवळजवळ सर्वांनीच मान्य केली आहे. प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनीदेखील वेळोवेळी आरक्षणावर भाष्य केले आहे. मात्र मोठ्या समूहाचा हा प्रश्न दुर्लक्षित आहे. त्यात जालना जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जारंगे पाटील या तरुणाने उपोषण छेडले आहे. या उपोषणास सर्वत्र पाठिंबा दिला जात आहे. मराठा आरक्षणासाठी ची मागणी आणि जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी बुलढाण्यात मोर्चा आयोजन आहे.

घोषणाही ठरल्या

मागील वेळी निघालेला क्रांती मोर्चा पूर्णतः मूक होता. मागण्यासाठी समाजिक सागर , मात्र एक घोषणादेखील दिली गेली नाही. मूक राहून समाज हुंकार भरत होता, तो आजतागायत राज्यकर्त्याना कळू शकला नाही. यंदा मात्र ‘जय जिजाऊ’ ‘जय शिवराय’ही मुख्य घोषणा राहणार आहे. शिवाय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं- मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अंतरवाली घटनेचा तीव्र निषेध सह एक मराठा – लाख मराठा गजर देखील होणार आहे. एकूणच यंदा घोषणांनी बुलढाण्याचे क्षीतिज व्यापणार आहे.


अशी आहे पार्किंग व्यवस्था..!

जिल्ह्याच्या सर्वच भागातून मोर्चेकरी येत असल्याने ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. त्यात अजिंठा, धाड रोडवरून येणार्‍यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंग राहणार आहे. घाटा खालून म्हणजे मोताळा- मलकापूर रोडने येणार्‍यांसाठी गुलाबचंद नगर तसेच चिखली, मेहकरवरून येणार्‍यांसाठी जिजामाता कॉलेज प्रांगण व डीएड कॉलेजच्या प्रांगणात पार्किंग जाणार आहे. शहरातील लोकांसाठी कवीदीप हॉस्पिटलजवळ व्यवस्था उभी करण्यात आली आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्यांचे गठण करण्यात आले असून, समन्वयकांकडून जय्यत नियोजन सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!