बुलढाणा (प्रतिनिधी) – मराठा सेवा संघ ही वैचारिक चळवळ महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात व जगभरात पोहोचली आहे. १ सप्टेंबर १९९० ला अकोला येथे शिवश्री अॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिडशे सहकार्यांना घेऊन स्थापना केलेल्या संघटनेत आज लाखो लोक जोडले गेले आहे. याचा विस्तार जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, शिक्षक परिषद, वारकरी परिषद, कृषी परिषदेसह ३२ कक्षांमध्ये झालेला आहे. ३३ वा वर्धापन दिन १ सप्टेंबर २०२३ ला येत असून, महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात हा वर्धापन दिन साजरा होत आहे. बुलडाणा येथे जिजामाता महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईसह राज्यभर मोठ्या प्रमाणात याच दिवशी वर्धापन दिन सोहळा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे ३३ कक्ष कार्यरत असून, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजन आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवश्री विनोद गायकवाड जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ हे राहणार आहे. तर उदघाटक म्हणून प्रशांत कोठे प्राचार्य जिजामाता महाविद्यालय, प्रमुख उपस्थितीत डॉ.अशोकराव खरात जिल्हाध्यक्ष मराठा सहकार परिषद, डॉ. मनोहर तुपकर राज्य सहसचिव, शिवश्री राजेश लोखंडे माजी जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व समाज बांधव, मराठा सेवा संघ परिवारातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन सुभाषराव कोल्हे व्यवस्थापकीय अध्यक्ष जिजाऊ स्रुष्टी सिंदखेडराजा, इंजी.सचिन तायडे जिल्हा सचिव मराठा सेवा संघ, रविंद्र चेके जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद, डॉ. भागवत भुसारी जिल्हाध्यक्ष आरोग्य कक्ष, योगेश पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड (उत्तर), प्रा.योगेश्वर निकस जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड (दक्षिण), शिवमती ज्योतीताई जाधव जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड (दक्षिण), शिवमती रंजनाताई घिवे जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड (उत्तर), पत्रकार शिवश्री गणेश निकम जिल्हाध्यक्ष तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद, शिवश्री संजय खांडवे जिल्हाध्यक्ष मराठा इतिहास परिषद, सोपान उगले जिल्हाध्यक्ष तुकोबाराय साहित्य परिषद, संजय धोरण, संजय विखे, विवेक काळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख यांनी केले आहे.