– हजारो अतिक्रमणधारक, भूमिहीनांचा मोर्चात सहभाग
बुलढाणा (संजय निकाळजे) – जिल्हाधिकारी व वनविभाग (डीएफओ) कार्यालयांवर भूमिमुक्ति मोर्चा व बहुजन मुक्ति मोर्चा यांच्यासह समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १७ ऑगस्टरोजी भरपावसात जिल्हाभरातील महसूल गायरान व वनजमीन शेती व निवासी हजारों अतिक्रमणधारक अन्यायग्रस्तांचा ‘ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है’ मोर्चा धडकला. भाई प्रदीप अंभोरें संस्थापक अध्यक्ष यांचे प्रमुख मार्गदर्शन आणि भाई रमेश गाडेकर, गजानन जाधव, अनिस पठाण, आदींचे नेतृत्त्वात भाई भीमराव खरात प्रदेशाध्यक्ष, अंबादास वानखेडे माजी सभापती, भाई मधुकर मिसाळ अमरावती विभाग, भगवान गवई मराठवाड़ा प्रमुख, शेषराव चव्हाण, मनोज पातालबंसी, भगवान तायडे, पंढरी इंगळे, मीराबाई राजगुरु इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनादरम्यान राज्यातील भूमिहीनांची येत्या कही दिवसात राज्यव्यापी परिषद घेंऊन हा लढ़ा भूमिमुक्ति मोर्चा व अन्य संघटनासह तीव्र करू व उच्च न्यायालय मुंबई, नागपूर न्यायालयीन निर्णयाबाबत संघटना कायदेशीरपणे अन्यायाविरूद्ध दाद मागेल, असा विश्वास मोर्चाप्रसंगी मार्गदर्शन करताना भाई प्रदीप अंभोरें संघटन प्रमुख यांनी दिला.
या मोर्चाला त्रिशरण चौकातून प्रारंभ झाल्यानंतर मोर्चेकरी ‘जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है।’ यासह घोषणा देत मोर्चा डीएफओ कार्यालय येथे वन विभागास मागण्याबाबत वनाधिकारी, बुलढाणा यांना निवेदन देऊंन बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मणीपूर राज्यातील महिला अत्याचार प्रकरणी दोषींना अटक करा, त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दख़ल करा, जिल्हातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांतील अतिवृष्टग्रस्त बहुजन, दलित, आदिवासी शेतकरी व अतिक्रमण निवासी नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन तथा जिल्हाभरातील हजारो हेक्टर गायरान व वनजमिनीवर लाखो गरीब बहुजन भूमिहीनांनी पेरणी केली असल्याने त्यांच्या शेतीवरील उभ्या पिकाचे व निवासी अतिक्रमण निष्कासन स्थगित बाबत राज्याचे महसूल मंत्री यांनी आश्वासन दिले, त्याची अमलजबावणी जिल्हा प्रशासनाद्वारे व्हावी, राज्यभरातील बहुजन भूमिहीनांची १०० टक्के कर्ज मुक्ति घोषणा, जिगांव पेनटाकळी, खडकपूर्णा प्रकल्प बाधित पट्टेधारक पर्यायी जमीन, वनजमीन अपात्र दावेदारांचे पुनर्विचार दावे दाखिल करून प्रालंबित पट्टे वाटप करून वनविभाग अवाजवी हस्तक्षेप थांबवा, शासकीय सर्व घरकुल अनुदान निधि १.२० लक्ष वरुन २.५ लक्ष करण्यात यावा, बुलढाणा जिल्हा नामांतर ‘मॉ जिजाऊ नगर’ जिल्हा घोषणा करा, नवीन जिल्हा निर्मितीत, बुलढाणा जिल्हा विभाजनात ‘उदयनगर’ स्वतंत्र तालुका घोषणा आदी मागण्यांबाबत मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांना जिल्हाधिकारी बुलढाणा मार्फत शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आळे.
शासनाने या मागण्यांबाबत घोषणा न केल्यास ३१ ऑगस्ट २०२३ ला शासन व प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्यात येंईल, असा इशारा भाई प्रदीप अंभोरें यांनी संयुक्त संघटनांवतीने निवेदनद्वारे दिला आहे. आंदोलन यशस्वीतेसाठी संघटना जिल्हा व तालुका नेते भरत मुंडे, अनिसभाई पठाण, लुकमान भाई, प्रवीण राजगुरु, गजानन जाधव, ज्ञानदेव मिसाळ, दत्ता पंजारकर, राम मेहत्रे, विजय खेडेकर, वसंत टापरे, नाना तायडे, मंगलसिंग चव्हाण, राजू टकसाल, जलीलखान पठाण, इलियाभाई पठाण, वकिल भाई, नागोराव पैठने, सुनील दांडगे, रामेश्वर चव्हाण, तुर्म पवार, गतरंग पवार, शालिनीताई बन्सोड, रेखाताई जाधव, सुमनबाई पवार, परूबाई जाधव, शीला जाधव, शोभा झिने, उषा जाधव, लिलाबई चेके, वत्सला गवई, वाघ बाई, गंगूबाई बन्सोड आदींसह हजारोंचे संख्येने दलित, आदिवासी, महिला व पुरुष मोर्चात सहभागी झाले होते.
———-