BULDHANAMEHAKARVidharbha

देऊळगाव साकरशा वनक्षेत्रात अवैध चराई; मेंढपाळांना २८ हजाराचा दंड, गुन्हेही दाखल!

मेहकर/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील वनक्षेत्रातील वनजंगलात मेंढ्या अवैधरित्या चराई करत असल्याची माहिती सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांना मिळताच त्यांनी सदर बाब वनपाल विजय मापारे यांच्या कानावर घातली. वनपालांनी पंचासमक्ष जावून सुमारे ७१ मेंढ्या व शेळ्या चराई करत असताना पकड़ल्या. तसेच मेंढपाळावर वनकायद्यान्वये गुन्हा दाखल करून, २८ हजार रूपयांचा दंडदेखील वसूल केला. ही घटना आज, ९ ऑगस्ट रोजी घड़ली.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील वनक्षेत्र क्रमांक ६१७ मध्ये मेंढ्याचे मोठे कळप अवैधरित्या चरत असल्याचे येथील सरपंच संदीप अल्हाट, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बी. एम. राठोड़, ग्रामपंचायत सदस्य रणजीत देशमुख यांना माहिती पड़ले. त्यांनी ही बाब येथील वनपाल विजय मापारे यांच्या कानावर घातली. वनपाल मापारे यांनी पंचासमक्ष घटनास्थळ गाठत, अवैध चराई करतांना ७१ मेंढ्या व शेळ्या पकड़ल्या. याप्रकरणी मेंढपाळ अनिल दादाराव शरमाळे (वय ४० वर्ष, रा.हिवरखेड़) व राजू लाहनू कारंड़े रा .निरोड़ ता.खामगाव यांच्याविरूध्द वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून चारशे रूपये प्रतीमेंढी या प्रमाणे सुमारे २८ हजार रुपये दंड़ वसूल केला. यावेळी सरपंच संदीप अल्हाट, बी.एम.राठोड़, रणजीत देशमुख, माजी सरपंच सखाराम आमल, संदीप गायकवाड़, पत्रकार नवल राठोड, कृष्णा चव्हाण, प्रदीप अल्हाट, योगेश पवार, राजू रोतळे, शंकर आमले, रहुल्ला पठाण, जीवन पवार यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ही कारवाई नव्यानेच रूजू झालेले वनपाल विजय मापारे, वनरक्षक पड़घान, भोंड़णे, वाठ, ढाकणे मॅड़म आदिंनी केली.

देऊळगाव साकरशा येथे आपण नव्यानेच वनपाल म्हणून रूजू झालो असून, यापुढेही कारवाई करण्यात कसूर करणार नाही, असे वनपाल विजय मापारे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.


वनविभागाने नियमाप्रमाणे कारवाई केली असली तरी जिल्ह्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे शेळी-मेंढी पालन करून उदरनिर्वाह करणारा धनगर समाज व शेतकरी वर्गासमोर चराईचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. एकतर शासन मेंढ्या व शेळया चराईसाठी पाससुध्दा देत नाही. तेव्हा या संदर्भात कारवाई करताना वनविभागाने गोरगरीब धनगर समाज व शेतकर्‍यांबद्दल थोड़ी सहानुभूती दाखविणे गरजेचे आहे, असाही सूर उमटत आहे. देऊळगाव साकरशा परिसरात बाहेरील तालुक्यातून मेढपाळ दाखल झाल्याने या भागातील जनावरे चराईचाही प्रश्न निर्माण होतो, याचाही विचार होणेगरजेचे आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!