बुलढाणा (प्रशांत खंडारे) – गुन्हेगार गुन्हा करताना काहीतरी पुरावा मागे सोडतो आणि तोच धागा पकडून पोलिसांची पथके गुन्हेगारापर्यंत पोहचतात. शोधकार्याचा मार्ग खडतर असला तरी पोलिसांनी आत्मविश्वासपूर्वक ठरवलं की, मग ‘कानून के लंबे हाथ’ गुन्हेगारांच्या मुसक्या निश्चितच आवळतात. बुलढाणा जिल्हा पोलिसांनी 1 जून ते 31 जुलै दरम्यान 45 गंभीर गुन्हे उघडकीस आणून 37 आरोपींना गजाआड करीत 28,56,860 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अभिलेखावर नोंद असलेले मालमत्ता संबंधीत आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल, आरोपी शोध तसेच मिसींग प्रकरणातील मोबाईलचा शोध घेणे संबंधाने पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी आदेशीत केले होते. या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 1 जून ते 31 जुलै या कालावधीमध्ये खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी- ज्यामध्ये शेतमाल सोयाबीन, मोबाईलफोन, किराणा माल, विद्युत साहित्य चोरी, मोटार सायकल चोरी, गौणखनिज असे गुन्हे उघड करुन आरोपी व गेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच बरोबर जिल्ह्याचे अभिलेखावर नोंद असलेल्या पाहिजे व फरार आरोपीतां पैकी एकूण 4 आरोपींना पकडून त्यांना संबंधीत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. जिल्ह्यांतर्गत एका खून प्रकरणी आरोपीला जेरबंद करण्यात आले असून, दोन दरोड्यातील गुन्ह्याचे 11 आरोपी पकडून 1358000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जबरी चोरीतील एक गुन्हा उघडकीस आणून 5 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये 120000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एका घरपोडीत एका आरोपीकडून 204000, पाच सोयाबीन चोरीतील 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून500000 रुपयांचा मध्यम आल जप्त करण्यात आला. तसेच तीन मोबाईल चोरी प्रकरणी 2 आरोपींना अटक करून 40000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शिवाय किराणामाल पुरी प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकून 35000 रुपयांचा मुद्देमाल तर 27 विद्युत चोरी प्रकरणी तीन आरोपींना जेरबंद करीत 510360 रुपयांचा मु्देमाल जप्त करण्यात आला. दोन दुचाकी प्रकरणी 2 आरोपींना अटक करून 280000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इतर जिल्ह्यातील 3 मोटरसायकल चोरी प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेऊन 525000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच एका गौण खनिज चोरीमध्ये 1 आरोपीला अटक करून 504500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान याच कालावधीत 4 आरोपींचा शोध घेण्यात आला. तब्बल 41 मोटरसायकली तर तब्बल 86 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे मोबाईल आज मोबाईल मालकांना सुपूर्द करण्यात आले.
यांनी केली दमदार कामगिरी…
सदरची कामगिरी सुनिल कडासने पोलीस अधीक्षक बुलडाणा, अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी.बी महामुनी, अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा यांचे आदेशाने प्रदिप पाटील उपविपोअ. मेहकर,विनोद ठाकरे उपविपोअ.खामगांव, डी.एस.गवळी उपविपोअ. मलकापूर, गुलाबराव वाघ उपविपोअ. बुलढाणा, अजयकुमार मालवीय उपविपोअ. देऊळगांव राजा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांचे नेतृत्वात पोनि. सारंग नवलकर पो.स्टे. सायबर बुलढाणा, पोनि. अशोक रत्नपारखी पो.स्टे. मलकापूर शहर, पोनि.अनिल बेहरानी पो.स्टे. नांदूरा, सपोनि. अमोल बारापात्रे पो.स्टे. जलंब, सपोनि. नंदकिशोर काळी पो.स्टे. साखरखेर्डा, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. विलासकूमार सानप, निलेश सोळंके, स्वप्नील नाईक, राहूल जंजाळ, पोउपनि श्रीकांत जिंदमवार आणि पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.