बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – बुलढाणा शहरात सद्भावना सेवा समितीद्वारा आजपर्यंत अनेक रामकथा व भागवत कथांचे सफलतापूर्वक आयोजन करण्यात आले असून, शहरातील व आसपासच्या ग्रामीण भागात या सर्व कथा लोकप्रिय झाल्या आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये देवी प्रियंकाजी यांची भागवत कथासुध्दा संपन्न होणार आहे. परंतु सद्भावना सेवा समितीद्वारा आजपर्यंत शिवपुराण कथा आयोजित केली नव्हती. शहरातील शिवभक्त महिलांच्या व सर्व समाजातील महिला मंडळांनी अधिक महिन्यात शिवपुराण कथेचे आयोजन करावे, अशी आग्रही सूचना केली होती. अधिक महिन्यात शिवपुराण कथेमध्ये लघुरुद्र पाठाचे आणि दानधर्माचे महत्व लक्षात घेऊन शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे.
अयोध्याच्या पावनभूमीवर भार्गव मुनीशजी महाराज यांचा जन्म १९८२ साली झाला. अयोध्या, वाराणसी येथे साहित्य संगीत व्याकरण, फलित ज्योतीषची आचार्य शिक्षा प्राप्त केली. विद्वत वरेण्य स्वामी श्री राम बालक दासजी महाराज सोबध हिंदुत्व पुनर्जागरण, सनातन धर्माची ध्वजा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संकल्प केला. देश विदेशात १५१ कथा आजपर्यंत पूर्ण करुन महाराष्ट्रात बुलडाणा शहरात प्रथमच आगमन होत आहे व त्याच्या मधुर वाणीत प्रथमच भव्य संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन २९ जुलै २०२३ पासुन राजे मंगल कार्यालय, बुलडाणा येथे दुपारी २ ते ६ या वेळेमध्ये करण्यात आले आहे. महाशिवपुराण कथेचा सर्व महिला मंडळाचा आग्रह असल्यामुळे १६ जुलै ला पेठेतील श्रीराम मंदिरात महिलांची सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये, अग्रवालसमाज, लेवा पाटील समाज, जयस्वाल , महिला मंडळ, पंजाबी समाज महिला मंडळ, परशुराम समाज महिला मंडळ, सींधी समाज महिला मंडळ, वर्मा समाज महिला मंडळ, माहेश्वरी समाज महिला व गुजराती समाज महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होत्या. एकूण ९ दिवस चालणार्या महाशिवपुराण कथे मध्ये ११ महिला मंडळांनी प्रत्येक दिवसाची उत्सव झाकीची, प्रसादाची स्वागताची जबाबदारी स्विकारली आहे.
उत्सवामध्ये शिवपार्वती विवाह, राम जन्म, लक्ष्मी विवाह, श्रीगणेश विवाह रीध्दी सिध्दी, ब्रम्हा विष्णू महेश, अर्धनारी नटेश्वर शिव तांडव इत्यादी सर्व उत्सव उत्सुफर्तपणे साजरे करणार आहेत. सभेमध्ये सपना अग्रवाल, पुनम जयस्वाल, माधुरी घोरपडे, अर्पिता शिंदे, मनिषा शर्मा, मुक्ता पाटील, अंजली पंजबी, रेणू पंजाबी, अंजली परांजपे, माया शर्मा, हंसा शर्मा, रत्ना जयस्वाल, कुसुम अग्रवाल, किरण चिराणीया, रुपा शर्मा, डॉली खुराणा इत्यादी असंख्य महिला उपस्थित होत्या समितीतर्पेâ चंपालालजी शर्मा, प्रा. प्रकाशचंद पाठक, सुरेश गट्टाणी, सिध्दार्थ शर्मा, लाला माधवाणी यांनी मार्गदर्शन केले तरी समितीद्वारा आयोजित महाशिवपुराण कथेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन सद्भावना समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले.