मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंच व समस्त मातंग समाज बांधव तथा गावकर्यांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी गावातील युवकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य गजानन वायाळ हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सागर पाटील, राजू पडघान, सुधाकर कुमठे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहाय्यक संपादक कैलास आंधळे, पत्रकार सुनील अंभोरे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अध्यक्ष गजानन वायाळ व सागर पडघान यांच्याहस्ते पुष्पहार घालून, मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी पुष्प वाहून अभिवादन केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर काही वत्तäयांनी प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणामध्ये गजानन वायाळ यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना अण्णाभाऊ साठे यांचे फार शिक्षण झाले नव्हते तरी त्यांनी ३५ कादंबर्या, १९ कथा संग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले होते. ‘वारणेचा वाघ ‘ ‘विजयांता’ ‘ ‘फकिरा’ या कादंबरीवर चित्रपटही निघालेत. १८ जुलै १९६९ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. खर्याअर्थाने जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना खरोखरच अभिवादन करायचे झाल्यास सध्या जी तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे. त्यांनी व्यसनमुक्त व्हावे हीच खरी आजच्या दिनी आदरांजली ठरेल. अशी संकल्पना समाज बांधवापुढे बोलताच समाजातील तरुणांनी योग्य प्रतिसाद दिला. सर्वांनी टाळ्या वाजवत या सूचनेचे स्वागत करत नवयुवक तरुणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
पुण्यतिथीचे औचित्य साधून गजानन वायाळ व सागर पडघान यांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. व्यसनमुक्तीची शपथ व वृक्षारोपण करून अण्णाभाऊ साठे यांना अनोखे अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष राजेंद्र एकनाथ तोडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वसंत तोडे, विष्णू तोडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष तोडे,मारुती तोडे, बाबु तोडे, राजू तोडे, अक्षय तोडे, सचिन तोडे, अनिल तोडे, आकाश तोडे, गजानन तोडे, देवानंद तोडे, जितू तोडे, शंकर तोडे, गणेश तोडे, रवी तोडे, अजय तोडे, सचिन नाडे, बाळू तोडे, वैभव तोडे, दीपक तोडे, जालिंदर तोडे, भगवान पारधे, बाळू तोडे, किरण हिवाळे, भगवान तोडे, गणेश पडघान, दिलीप पडघान, राजु पडघान, सुधाकर कुमठे, पत्रकार सुनील अंभोरे, कैलास आंधळे व सर्व समाज बांधव व गावकरी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन प्रकाश तोडे तर आभार राजू तोडे यांनी मानले.