Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

‘नागड्या’ सोमय्याचे दिवस भरले!; फडणवीसांनी ठणकावले, ‘दोषीला सोडणार नाही’!

– मराठी अधिकारी महिलांचेही शोषण केल्याचा आरोप?; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचा खासदार व नेता किरीट सोमय्या याचा अश्लील व्हिडिओ लोकशाही या वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या शिवाय, सोमय्या याने अनेक मराठी महिला अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचेही आरोप होत आहेत. सोमय्या प्रकरणी विरोधकांनी आज विधिमंडळात आवाज उठवताच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल. कुणाकडे पुरावे असतील तर ते पोलिसांना द्यावेत, महिलांची ओळख उघड होऊ न देता, कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. त्यामुळे मराठी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे बेछुट व खोटे आरोप करून त्यांची बदनामी करणार्‍या किरीट सोमय्याचे दिवस भरले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

किरीट सोमय्या याच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील किरीट सोमय्याच्या अश्लील व्हिडिओवरून सरकारला धारेवर धरले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर या व्हिडिओची गृहमंत्रालयामार्फत चौकशीची मागणी केली. आपल्याकडे सोमय्या याने मराठी अधिकारी महिलांना ब्लॅकमेल करत त्यांचे शोषण केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत, अशी माहिती देऊन सोमय्या याच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली. तर सोमय्यासाठी भाजपकडे वेगळा निकष आहे का, या व्हिडिओ व सोमय्याने केलेल्या शोषणाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनीही सोमय्यावरून भाजपला धारेवर धरले. सोमय्या हा स्वतःच घाणेरडा माणूस आहे, त्याला दुसर्‍यावर चिखलफेक करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका करत सोमय्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

https://twitter.com/i/status/1681115829704990720

दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या आक्रमक भूमिकेला उत्तर दिले. ते म्हणाले, की आम्ही किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओच्या संदर्भात सविस्तर चौकशी करू. याबाबत काहीही लपवाछपवी केली जाणार नाही. तसेच, विरोधकांकडे काही माहिती व पुरावे असेल तर ती आम्हाला द्यावेत. आम्ही कुणालाही सोडणार नाही. आम्ही पीडित महिलांची ओळख उघड होऊ देणार नाही. परंतु, पोलिस दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चित करेल. शिवसेना नेते (ठाकरे) तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व अनिल परब यांच्या मतांशी आम्ही सहमत आहोत. हा खरे तर गंभीर प्रकार आहे. राजकारणात कधी कधी गंभीर समस्यांचा आरोपांचा सामना करावा लागतो. त्यामुळे नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नही निर्माण होतो. परंतु, अश्लील व्हिडिओ व लैंगिक शोषण प्रकरणात आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


दरम्यान, कालपासून मूग गिळून बसलेल्या किरीट सोमय्या याने आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लोकशाही वृत्तवाहिनीने प्रसारित केलेला व्हिडिओमागे राजकारण असल्याचा आरोप केला. तसेच, या व्हिडिओची तपासणी करावी, अशी मागणी केली. तसेच, आपण कोणत्याही महिलांसोबत गैरव्यवहार केला नसून, आपली बदनामी होत असल्याने याही प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी पत्र लिहून केली आहे. हे पत्र सोमय्या याने ट्वीटदेखील केले आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!