– चिखली शहरात युवा सेनेला भगदाड?
चिखली (तालुका प्रमुख) – चिखली शहरातील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक व युवासेना शहरप्रमुख दत्ता सुसर यांच्यासह युवासेना उपप्रमुख शैलेंद्र डोणगावकर, शरद सरनाईक, अमर सुसर व इतर सहकार्यांनी आज (दि.९) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या विकास कार्यावर प्रभावित होऊन भाजपामध्ये प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे, सुसर यांनी काही दिवसांपूर्वीच युवा सेनेच्या स्थानिक नेतृत्वावर तोफ डागली होती. सुसर यांच्या भाजप प्रवेशाने चिखली शहर व तालुक्यात युवा सेनेला चांगलेच भगदाड पडले आहे.
भाजपप्रवेश प्रसंगी शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस, शिवराज पाटील, नगरसेवक सुभाषआप्पा झगडे, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, विजय वाळेकर, योगेश झगडे, संदीप लोखंडे, विशाल नेमाने, आकाश चुनावाले आदी उपस्थित होते. सुसर यांच्या भाजप प्रवेशामुळे युवा सेनेचे आणखी काही पदाधिकारी भाजपमध्ये येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
———–