माणिकदौंडी घाटात डिझेल टँकर उलटला; भीषण स्फोटात चौघे होरपळले, दोघे ठार!
अपडेट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये डिझेल नव्हे तर इथेनॉल होते. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या टँकरमध्ये चालक आणि इतर प्रवासी प्रवास करत होते. टँकर पलटी झाल्यानंतर काही लोकांनी उड्या घेतल्या. त्यात लहू सांडू पवार, सुमन लहू पवार, जगदीश जगन पवार, कोमल जगन पवार हे प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते. तर गणेश रामराव पालवे,सुरैया बशीर शेख हे गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींवर पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. या जखमींपैकी गंभीर जखमी झालेल्या गणेश रामराव पालवे हा टँकर चालक तर प्रवासी सुरैया बशीर शेख यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. गणेश पालवे हा या टँकरचा दुसरा चालक होता. मात्र गणेश हा टँकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता. त्याच बाजूने टँकर पलटल्याने तो टँकर खाली सापडला होता. महिला अत्यंत गंभीररित्या जखमी झाली होती. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडीकडून पाथर्डीकडे येत असलेल्या इथेनॉलच्या टँकरचा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणावर भीषण अपघात होऊन स्फोट झाला. या घटनेत टँकरने पेट घेतला. दरम्यान, या टँकरमध्ये असलेले चौघे जखमी झाले असून, त्यांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेहोते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला वळणावर गुरुवारी (दि.६) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान डिझेलचा टँकर उलटला. त्यामुळे डिझेल रस्त्यावर उसळल्याने त्याने पेट घेतला व टँकरचा स्फोट झाला. या अपघातात टँकरमधील चालकासह चौघेजण होरपळले गेले. या जखमींना पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टँकरला लागलेली आग अत्यंत भीषण स्वरुपाची असल्याने त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बराचवेळ बचाव कार्यात अडथळा आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली, व बचावकार्य केले. पुढील तपास पोलिस करत आहे.
———