पाचाेड (विजय चिडे) – जालनाकडून नगरकडे ऑईलने भरलेले ड्रम घेऊन भरधाव जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनाच्या वेगावरील नियंत्रण सुटून ट्रक दुभाजकावर धडकून उलटल्याची घटना गुरुवारी (ता.सात) दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोड – पैठण रस्त्यावर आखतवाडा (ता.पैठण) जवळ घडली. या दुर्घटनेत दाेघेजण जखमी झाले आहेत.
जालनाकडून मुंबईकडे दुपारी दोन वाजेच्या सुमारास ऑईलचे भरलेले ड्रम घेवून ट्रक (क्र.एम.एच.४०सी डी .- ६१९१) हा भरधाव जात होता. मात्र या ट्रक चालकाचे आखतवाडा पुलावरच वेगावरील नियंत्रण सुटले व सदर ट्रक पुलाच्या संरक्षक कठडयाला धडकून रस्त्यावर उलटला. हा भरधाव ट्रक पाचोड _ पैठण रस्त्यावरील ऐन पुलावर आडवा होऊन तो पैठण ऐवजी पाचोडच्या दिशेने फिरला. यात दोन जण किरकोळ जखमी झाले. ट्रकमधील सर्व ड्रम ऑईलने भरलेले असल्याने संपूर्ण रस्त्यावर ऑईल सांडले. या राज्य महामार्गवरती वाहन आडवे झाल्याने तब्बल दोन तास वाहतूक खोळंबूंन दुतर्फा दोन किलोमिटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. अखेर ग्रामस्थ व वाहनधारकांनी जेसीबी आणली व जेसीबीच्या सहाय्याने आडवा ट्रक व विखूरलेले ऑईलचे ड्रम गोळा केले व त्यानंतर रस्ता मोकळा करुन वाहतुक वाहतूक सुरळीत केली.
या ऑईलमुळे काही विपरीत घटना घडू नये, यामुळे घटनास्थळी अग्निशामक दलचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच टँकरला रस्त्याच्या सरळ करण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. दोन तासभरानांतर अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.