बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – शेतकर्यासाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाचे चौदा दिवस उलटून गेले तरीही पाऊस पडायला तयार नसल्यामुळे शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, शेतकर्याच्या पेरण्या थांबल्या आहेत. शेतकरी शेतीमशागतीची कामे आटपून पेरणीसाठी सज्ज झाला आहे.
शेतात पाऊस नसल्यामुळे पेरणी थांबली आहे. त्यामुळे शेतकर्याला आनंदी सुखी राहण्यासाठी रामनगर तालुका डिग्रस येथील नाथपंथी समाजाचे तानाजी शेगर, मनोहर शिंदे, मनोहर शितोळे, शिवाजी शेगर, दत्ता शिंदे, सौमी सेगर हे बिबी येथे येऊन उघड्या अंगाला कडूनिंबाची डहाळे बांधून एका बेंडकीला काठीला बांधून –
धोंडी धोंडी पाणी दे..
पाण्याचे दिवस लवकर येऊ दे..
याचकले बेंडकी पाणी बुलाव..
काळा कचरा खोबर्याची वाटी…
बेंडकी बांधली पाण्यासाठी…
हनुमान बाबा सत्याचा…
पाड बांधला मोत्याचा…
असे गीत गावून आकाशाला गवसणी घालत होते. लवकर पाऊस पडू दे …बळीराजाला सुखी होऊ दे… अशी प्रार्थना करत असताना गावांमध्ये त्यांच्यासोबत असलेल्या बेंडकीवर पाणी टाकून अनेक शेतकर्यांनी पूजा केली, आणि त्यामुळे लवकर पाऊस पडेल, असेही बोलल्या जात आहे.
—-