– गावकर्यांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला!
मेहकर (रवींद्र सुरूशे) – तालुक्यातील देऊळगाव माळी येथे काल (दि.१७) सकाळी सुमारे आठ वाजच्या दरम्यान सुभाष चाळगे यांच्या घराला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. यामध्ये घरात ठेवलेली सोयाबीन ६० कट्टे, दोन पेट्रोल पंप, मेडिकल स्टोरची औषधे, संसार व घर उपयोगी साहित्य, तसेच शेती उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी आपआपल्या परीने आग वझविण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली. या लागलेल्या आगीमध्ये जवळपास शेतकर्याचे तीन लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सुदैवाने अग्नीमध्ये जीवित हानी झाली नाही. परंतु वित्तहानी झाली.
घटना घडल्यानंतर ताबडतोब महसूल विभागाचे तलाठी राहुल वानखेडे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. व सदर पुढील पंचनामा हा तहसीलदार मेहकर यांच्याकडे वर्ग केला. पंचनामा करतेवेळी पोलीस पाटील गजानन चाळगे, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मगर, जयराम बकाल, गजानन पोकळे, संदीप सुरूशे, वसंता चाळगे, व आदी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. तर महावितरण विभागाच्या वतीने श्री चव्हाण, राजू बळी, व महावितरणाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पेरण्यासाठी विकत घेतलेली सोयाबीनसुद्धा शेतकर्याची जळून खाक झाली. ऐन पेरणीच्या वेळेमध्येच शेतकर्यावर भले मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकर्याला लवकरात लवकर महावितरण विभाग व महसूल विभागाकडून मदत मिळण्याची मागणी शेतकरी सुभाष चाळगे, यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.