बुलढाणा (संजय निकाळजे) – मृग नक्षत्र सुरू होताच ‘पेरते व्हा’ असा आवाज पक्षाच्या तोंडी उतरतो. असा शेतकर्यांचा समज आहे. म्हणूनच मृगाच्या पावसाला सुरुवात झाली की शेतकरी राजासुद्धा बी बियाणे पेरणीला लागतो. मात्र या नक्षत्राच्या सुरुवातीलाच मृगधारा बरसल्या नसल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. वातावरणातील बदल घडताना ऋतूचक्रातील पावसाळी नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणार्या मृग नक्षत्राला आठ जूनपासून सुरुवात झाली, असून हे नक्षत्र हत्तीवर येत असल्याने जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त होती. मागील ८ दिवसात मात्र पाऊस नसल्याने हत्तीची ही चाल कोरडीच ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
भारतीय खगोल शास्त्रानुसार २७ नक्षत्र पैकी पावसाची नऊ नक्षत्रे आहेत. पृथ्वीभोवती फिरणार्या संपूर्ण नमो मंडळाचे २७ भाग पाडले गेले आहेत. प्रत्येक भागाचा तारकासमूह निर्देशित आहे. त्यांना नक्षत्रे असे म्हणतात. अश्विनी, कृतिका, रोहिणी, मूग्र, आदरा, पुनर्वपुश्य, आश्लेषा, मघा ,पूर्वा ,तरा, हस्त चित्र, स्वाती, विशाखा ,अनुराधा, ज्येष्ठा, मुळापूर्वा, उत्तरा ,श्रवण, गणेशा शततारखा ,पूर्वा रेवती या नावे नावाने नक्षत्रांची ओळख आहे. आठ जूनला मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असून नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ती वाहन असलेल्या नक्षत्रात चांगला पाऊस पडतो, असे जाणकार शेतकरी सांगतात. नक्षत्राला सुरुवात झाली असली तरी नक्षत्रापूर्वी फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. अवकाळी पावसाचे काही प्रमाणात आगमन झाले असेल तरी हा पाऊस अधिक करून शेतकर्यांसाठी नुकसानदायक ठरला आहे. खरीप हंगाम पूर्व मशागत देखील लांबली आहे. पण मशागतीसाठी शेतकर्यांनी दिवस-रात्र एक करून खरीप हंगाम पूर्व मशागत कामे आटोपले आहेत. मृग नक्षत्राची सुरुवात गुरुवार आठ जून पासून झाली आहे. नक्षत्राचे वाहन हे हत्ती असल्याने चांगल्या पावसाच्या अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने तळपते ऊन आरोग्यासाठी घातक ठरू लागले आहे. खरीपासाठी लागणारे बी- बियाणे आणि औषधी खते किंवा शेतकर्यांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. यंदाच्या वर्षात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे .गतवर्षीपेक्षा कापसाची लागवड कमी होईल अशी अपेक्षा आहे. कापसासाठी लागणारा वेळ, पैसा, मेहनत तसेच मजुरी पाहता उत्पन्न व उत्पादन व उत्पन्न कमी होऊ लागले आहे. परिणामी कापसाचे क्षेत्र घटनेची शक्यता आहे. मृग नक्षत्रांनी चांगली सुरुवात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भरपूर व चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीला लागणार आहे.
पावसाळ्यातील नक्षत्र आणि वाहन…
८ जून सूर्याचा मूर्ख शीर्ष नक्षत्र प्रवेश वाहन हत्ती, २२ जून सूर्याचा आदरा नक्षत्र प्रवेश वाहन मेंढा, ६ जुलै सूर्याचा पुनर्वसू नक्षत्र प्रवेश वाहन गाढव, २० जून सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश वाहन बेडूक, ३ ऑगस्ट सूर्याचा आश्लेषा नक्षत्र प्रवेश वाहन म्हैस, १७ ऑगस्ट सूर्याचा बघा नक्षत्र प्रवेश वाहन घोडा, ३१ ऑगस्ट सूर्याचा पूर्वा नक्षत्र प्रवेश वाहन मोर, १३ सप्टेंबर सूर्याचा उत्तरा नक्षत्र प्रवेश वाहन हत्ती, २७ सप्टेंबर सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश वाहन बेडूक, ११ ऑक्टोबर सूर्याचा चित्र नक्षत्र प्रवेश वाहन उंदीर, २४ ऑक्टोबर सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश वाहन घोडा ,असे हे नक्षत्र व वाहन आहेत.