BULDHANAHead linesVidharbha

जिल्ह्याच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्याचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्‍हाडे यांनी १०० वर्षापेक्षा जुनी आणि जगातील एक मोठी आव्हानात्मक समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील  कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी १०.४२ तासांत ८७.७ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या यशाने जिल्ह्याची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे. त्यांचे मूळगाव मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी हे आहे.

दक्षिण आप्रिâकेतील कॉम्रेड मॅरेथॉन १९२१ ला सुरु झाली. या स्पर्धेला २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाले आहेत. साऊथ आप्रिâकामधील पिटरमेरीटबर्ग व डर्बन ह्या दोन शहरामध्ये ही मॅरेथॉन संपन्न होते. हे अंतर ९० किलोमीटर मीटर आहे. पिटरमेरीटबर्ग येथून सुरू होऊन डर्बनला स्पर्धा संपली. याला डाऊन रन असे म्हणतात. तर डर्बनपासून सुरू होऊन स्पर्धा पिटरमेरीटबर्गला संपली. त्यास अप रन म्हणतात. ह्यावर्षीचा डाऊन रन होता. त्याचे नियोजित अंतर ८७.७ किमी होते. सकाळी ५.३० ला स्पर्धा सुरु होते आणि सायंकाळी ५.३० ला बरोबर बंद केली जाते. १२ तासाच्या आत स्पर्धकांना ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. जे स्पर्धा पूर्ण करतात त्यांना स्पर्धा पूर्ण केल्याचे मेडल प्राप्त होते. सकाळी ५ डिग्री तापमान होते आणि दिवसा ते वाढत वाढत २५ डिग्री पर्यंत गेले होते. जगभरातून २५००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता.
भारतातून ३८८ जणांनी भाग घेतला होता. यामध्ये अमरावती येथील दिलीप पाटील यांचाही सहभाग होता. ते सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त आहेत. अमरावती मॅरॉथॉन स्पर्धेचे ते जनक आणि आयोजक आहेत. गेली २५ वर्षे झाली ते नियमित मॅरॉथॉन रनर आहेत. त्यांनी जगभरातील शेकडो मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. आणि ही त्यांची ८ वी कॉम्रेड मॅरेथॉन होती. त्यांनी ती १०.४१ तासात पूर्ण केली. तसेच अमरावती येथील म्हाडामध्ये अभियंता असलेल्या दिपमाला साळुंखे यांनी सुद्धा ही आव्हानात्मक स्पर्धा ११.५० तासांत पूर्ण केली.


दोन वर्षांपासून खुणावत होती कॉम्रेड मॅरेथॉन

ललितकुमार वर्‍हाडे २०१५ पासून नियमित रनिंग आणि सायकलिंग करतात. या अगोदर त्यांनी २१ किमी, ४२ किमी, ५० किमीच्या मॅरेथॉन धावलेल्या आहेत. आतापर्यंत किमान ५० पेक्षा जास्त मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला आहे. मागील २ वर्षापासून ही स्पर्धा त्यांना खुणावत होती. त्यासाठी अमरावती येथील दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनात मागील सहा महिन्यापासून त्यांनी प्रशिक्षण सुरु केले होते.


निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी नियमितपणे कोणतातरी व्यायाम करणे गरजेचे आहे. रनिंग आणि सायकलिंग हा फार चांगला व्यायाम आहे. सातत्य, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर आपण कोणतेही लक्ष सहज गाठू शकतो. बाहेर देशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करणे ही फार अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेने ती संधी मला दिली.
– ललितकुमार वर्‍हाडे, उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कारंजा लाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!