AalandiHead linesPachhim Maharashtra

अलंकापुरीत उद्या माऊलींचे वैभवी पालखी सोहळ्याचे प्रस्थान

भाविकांच्या स्वागतास तीर्थक्षेत्र आळंदी नगरी सज्ज!

आळंदी / प्रतिनिधी : माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अलंकापुरीत भाविक हरिनाम गजर करीत प्रवेशत आहेत. शनिवारी ( दि. ११ ) अंकली हून निघालेले श्रीचे अश्व आळंदीत दाखल झाले आहेत. श्रीचे वैभवी पालखी सोहळ्याचे रविवारी ( दि.६ ) माऊलीं मंदिरातील वीणा मंडपातून पांडुरंगाचे भेटीस जाण्यास सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. दरम्यान भाविकांच्या स्वागतास अलंकापुरी नगरी सजली आहे. तीर्थक्षेत्रातील विविध ठिकाणी केलेल्या रोषणाईने शहर लख उजळले आहे.

आळंदीतून माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान असे होणार – श्रीचे पालखी सोहळ्यास रविवारी ( दि.६ ) दुपारी चार च्या सुमारास मुख्य सोहळा सुरू होणार असल्याची माहिती व्यवस्थापक माऊलीं वीर यांनी दिली. तत्पूर्वी सोहळ्याच्या दिवशी पहाटे चार वाजता घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, व दुधारती होईल. त्यानंतर पहाटे पाच ते सकाळी नऊ या दरम्यान भाविकांच्या चलपादुकांवर महापूजा आणि श्रीचे समाधी दर्शन होईल. पुढे दुपारी बारा वाजे पर्यंत श्रीचे समाधी दर्शनास गाभारा भाविकांसाठी खुला राहील. दरम्यान सकाळी नऊ ते अकरा यावेळात विना मंडपात कीर्तन सेवा होईल. दुपारी बारा ते साडेबारा या वेळात श्रीचा गाभारा स्वच्छता, श्रीचे समाधीस जलाभिषेक,महानैवेद्य होईल. त्यानंतर दुपारी दोन पर्यंत पुन्हा भाविकांना श्रीचे समाधी दर्शन घेता येईल. श्रीचे वैभवी प्रस्थान सोहळ्यासाठी ४७ दिड्याना मंदिरात प्रवेशण्यास दोन ते अडीचच्या सुमारास सुरुवात होईल. दरम्यान यावेळी श्रीनां वैभवी पोशाख करण्यास गाभा-यात सुरुवात होणार असल्याचे वीर यांनी सांगितले.चारच्या सुमारास श्रीचे वैभवी पालखी सोहळ्याचे मुख्य सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यात श्री गुरु हैबतरावबाबा यांचे तर्फे आरती, त्यानंतर संस्थान तर्फे श्रीची आरती होईल. मुख्य मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप, दरम्यान विना मंडपातील श्रीचे पालखीत श्रीचे चल पादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यानंतर आळंदी देवस्थान तर्फे मानक-यांना पागोटी वाटप परंपरेने होईल. यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे तर्फे दिंडी प्रमुख, प्रतिष्ठित, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप होईल. त्यानंतर संस्थान तर्फे श्रीचे गाभा-यात नारळ प्रसाद वाटप झाल्यानंतर श्रीचे पालखीतून विना मंडपातून हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा आणि पहिला मुक्काम आळंदीत समाज आरतीने गांधी वाड्यातील जागेत नव्याने विकसित आजोळघरी होईल. श्रीचे नवीन दर्शनबारी सभागृहातील जुन्या गांधी वाड्याचे जागेत भाविकांना दर्शन आणि रात्रीचा जागर, गांधी परिवार तर्फे श्रींचे पालखी सोहळयाचा पाहुणचार होईल.


आळंदीत पालखी सोहळा आरोग्य दिंडी उत्साहात

आळंदीतील माऊलींचे पालखीचे प्रस्थान पूर्व संध्ये ला आरोग्य, स्वच्छता जनजागृती अंतर्गत आरोग्य दिंडीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद, पुणे आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय आळंदी येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी या आरोग्य दिंडीत सहभागी झाले होते. आरोग्य दिंडीत चिमुकले वारकरी यांनी विशेष सहभाग नोंदवला. आरोग्य दिंडीमध्ये उष्माघात जणजागरण, हिवताप , डेंग्यु, जणजागरण, क्षयरोग, कुष्ठरोग इत्यादी आरोग्य विषयक जोखमीच्या विषयांची फलकांद्वारे माहिती देण्यात आली. आरोग्य दिंडीचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय आळंदी रुग्ण कल्याण समितीचे संचालक डी. डी .भोसले पाटील यांचे हस्ते झाले. आरोग्य दिंडीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा नारायण पारखे, ग्रामीण रुग्णालय आळंदीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक सुधाकर म्हाकाळे, ज्ञानेश्वर आढाव ,श्रीमती ज्योती रणदिवे, हिवताप पर्यवेक्षक रेवननाथ ढाकणे, अभिजीत काळे, श्रीमती वैष्णवी देशमाने, श्रीमती. कविता उभे, प्रशांत सोनवणे, हरीश होनावळे, हरीश जाधव आदी आरोग्य विभागाचे कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले. आळंदी येथील संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर ही दिंडी उत्साहात जनजागृती करीत पार पडली.


खांदेक-याचे आणि दिंड्यातील वारकऱ्याच्या संख्येवर नियंत्रण

माऊलींचा सोहळा वाढत असल्याने सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन आणि आळंदी देवस्थान करीत आहे. यावर्षी खांदेकरी भाविक-नागरिकांना मंदिर प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे.आळंदीकर ग्रामस्थ श्रीची पालखी प्रस्थान आणि नगरप्रदक्षिणे दरम्यान खांद्यावर घेत प्रदक्षिणा होते. वारकऱ्याच्या दिंडीतील वारक-याची संख्या वाढत आहे. खांदेकरी यांची संख्या कमी करून काय उपयोग असा सवाल आळंदीकर ग्रामस्थ करीत आहेत. यावर्षी खांदेकरी युवकांना मंदिरात पासने प्रवेश दिला जाणार आहे. माऊलींच्या मंदिरात श्रीचे पालखीचे प्रस्थान दिनी परंपरेने पालखी रथा पुढील २० व मागील २७ अशा दिंड्याना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.यातील वारक-यांच्या संख्येवरील मर्यादा कोण आणणार असा सवाल आता खांदेकरी संख्या कमी होऊ लागल्याने नागरीकातून पुढे आला आहे. ४७ दिंड्यातील प्रत्येक दिंडीतील ७५ वारकरी यांना यावर्षी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिंडीचे रचने प्रमाणे वारकऱ्याची संख्या देखील मर्यादित केल्यास गर्दी नियंत्रित राहील. असा ही विचार आळंदीत आता मांडला जात आहे.

श्रीचे पालखीसह रथाची पुष्प सजावट
पालखी सोहळ्यात श्रीचे पालखीसह रथाची पुष्प सजावट आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली गेली वर्षे सेवा केली जात आहे.यात सुदीप आणि प्रदीप गरुड बंधू नानासाहेबांच्या देखरेखीखाली काम पाहत आहेत.याबाबत कोणत्याही प्रकारचा मोबदला, मानधन घेतले जात नाही.केवळ सेवाभाव जोपासत ही विनामूल्य सेवा केली जाते.श्रीची पालखी आळंदीत परत येई पर्यंत सेवा दिली जाते.या सेवेचे भाविकही कौतुक करतात.या वर्षीचे नियोजन झाले असल्याचे प्रदीप गरुड यांनी सांगितले.या सेवेसाठी दहा कारागीर देखील सेवाभाव जपत पुष्प सजावट करून माउलीचे सोहळ्यात अनुभूती घेतात. स्व. माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड परिवार हे माऊली भक्त करीत असून गेल्या ३६ वर्षां पासून माऊलींच्या पालखी रथास सुगंधी फुलांनी सजावट करीत श्रीचे वैभवी पालखी रथासह श्रीचे पालखीचे वैभव वाढवितात. यासाठी विविध रंगी सुगंधीत फुलांचा वापर केला जातो.२ वाहने यासाठी वापरली जातात.यात जाई, जुई, मोगरा, लिली, गुलाब, गुलछडीसह विविध रंगीबेरंगी फुलांचा वापर केला जातो असे सुदीप गरुड यांनी सांगितले.

इंद्रायणी नदी घाटावर भाविकांची गर्दी
आषाढी पायी वारी प्रस्थानसाठी लाखो वारकरी विना,टाळ-मृदंगाच्या त्रिनादात आणि माउली नामजय घोषात अलंकापुरीत दाखल होत आहेत. महिला भाविकांच्या डोईस तुळशी वृंदावन आणि पुरुषांच्या खांद्यावर भगवी पताका आणि खांद्यावरील टाळ, मुखी हरिनाम करीत दाखल होत आहेत. विविध दिंड्या अलंकापुरीकडे मार्गस्थ झाल्या असून गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत सर्व दिंड्या दाखल होतील असे पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी सांगितले.
बाळासाहेब भोसले यांचा पालखीच्या पुढे नगारखाना

श्रीचा पालखी सोहळा समीप येत असल्याचे सांगणारा आळंदीतील बाळासाहेब दगडू भोसले यांचा पालखीच्या पुढे नगारखाना असतो. यात चौघडा वाजविला जातो.त्यांनी तयारी पूर्ण केली असून वैभवी नगारखाना सजविला आहे. श्रीचा वैभवी पालखी रथ सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. नवीन बैलजोडीची नव्या रथासह चाचणी घेण्यात आली.यावर्षी तुळशीराम भोसले, रोहित भोसले यांची बैलजोडी सेवेस ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्या प्रमाणे बैलजोडी आणून मिरवणूक देखील आळंदीत झाली आहे. सेवेक-यांनी श्रींचे रथास बैलजोडी जुंपत चाचणी घेतली. दरम्यान भोसले परिवार यांचे बैलजोडीची आळंदीत मिरवणूक काढण्यात आली आहे. नवीन दर्शन बारी चा वापर भाविकांसाठी सुरू करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वर-खाली उतरताना वृद्ध भाविक-महिला वारकरी यांना गैरसोयीचे ठरत होते.गर्दी नसताना भाविकांना जिन्याचे दर्शन बारीचा वापर करण्या बाबतच्या नियोजनाचा आळंदी देवस्थानने फेरविचार करावा अशी मागणी वारकरी- भाविक यांच्यातूंन होत आहे. खाली बारी रिकामी असताना वरून खाली बारीतुन भाविकांना सोडले जात होते.गर्दी वाढेल त्या प्रमाणे वर भाविकांना सोडण्याची गरज असताना थेट वरील मजल्यावरून पुन्हा खाली येण्याचे प्रयोजन समजत नसल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.

वारी मार्गावर स्वच्छता उपक्रम

यावर्षीचे सोहळ्याचे नियोजनात आळंदी ते पंढरपूर या वारीचे मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम, जनजगृती करीत राबविण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय माँ नर्मदा परिक्रमा सेवा संघ महाराष्ट्र संयोजक दिलीप महाराज ठाकरे यांनी दिली. पुणे आळंदी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज धाकट्या पादुका येथून या अभियानास सुरुवात होणार असल्याचे ठाकरे महाराज यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र आळंदीत श्रींचे प्रस्थान सोहळ्या निमित्त राज्य परिसरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षितता आणि दक्षता उपाय योजनेची पाहणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस प्रशासनाने घेतली आहे. या निमित्त आळंदी शहरातून विविध पोलीस विभागातील पोलिसांनी अधिकाऱ्या समवेत पाहणी करून पालखी प्रस्थान सोहळ्याची आणि प्रदक्षिणा मार्गाची आणि मंदिर परिसरातील नियोजनाची पाहणी केली. आळंदीत ठिकठिकाणी टेहळणी मनोरे तैनात करण्यात आले असून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला आहे. आळंदीत पोलीस प्रशासन आणि महसूल, आरोग्य यंत्रणेच्या भोजनाची तसेच पिण्याचे पाण्याची थेट जागेवर व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस मित्र भाविकांचे सेवेस सज्ज
आळंदी पोलिसांची सहकार्यासाठी तसेच भाविकांचे मदतीसाठी आळंदी परिसरातील युवक तरुण सज्ज झाले आहेत. मंदिर परिसरात तसेच ठिकठिकाणीचे चौकात सुरळीत वाहतूक सेवा रहावी, वाहतूक कोंडी तसेच चेंगरा चेंगरी होऊ नये यासाठी दक्षता घेत पोलीस प्रशासनास मदत करण्यासाठी सुमारे ६० पोलीस मित्र तैनात रहाणार असल्याची माहिती पोलीस मित्र युवा मानसंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण बोबडे यांनी दिली. आळंदीतील माऊलींचे पालखीचे प्रस्थान पूर्व संध्ये ला आरोग्य, स्वच्छता जनजागृती अंतर्गत आरोग्य दिंडीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद, पुणे आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय आळंदी येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी या आरोग्य दिंडीत सहभागी झाले होते. आरोग्य दिंडीत चिमुकले वारकरी यांनी विशेष सहभाग नोंदवला. आरोग्य दिंडीमध्ये उष्माघात जणजागरण, हिवताप , डेंग्यु, जणजागरण, क्षयरोग, कुष्ठरोग इत्यादी आरोग्य विषयक जोखमीच्या विषयांची फलकांद्वारे माहिती देण्यात आली. आरोग्य दिंडीचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय आळंदी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डी. डी .भोसले पाटील यांचे हस्ते झाले.

आरोग्य दिंडीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा नारायण पारखे, ग्रामीण रुग्णालय आळंदीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक सुधाकर म्हाकाळे, ज्ञानेश्वर आढाव ,श्रीमती ज्योती रणदिवे, हिवताप पर्यवेक्षक रेवननाथ ढाकणे, अभिजीत काळे, श्रीमती वैष्णवी देशमाने, श्रीमती. कविता उभे, प्रशांत सोनवणे, हरीश होनावळे, हरीश जाधव आदी आरोग्य विभागाचे कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले. आळंदी येथील संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर ही दिंडी उत्साहात जनजागृती करीत पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!