ChikhaliVidharbha

फुटबॉल स्पर्धेत अनुराधा इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तरावर सुवर्ण कामगिरी

चिखली (तालुका प्रतिनिधी) – एज्युकेशन स्पोर्टस प्रमोशन फाउंडेशन इंडिया, अभिजित विभागीय क्रीडा संकुल मिनाताई ठाकरे स्टेडिअम नाशिक येथे २ ते ४ जूनरोजी पार पडलेल्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अनुराधा इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याला तीन सुवर्ण पदक मिळवून देऊन राष्ट्रीयस्तरावर अनुराधा इंग्लिश मीडियमचे नाव कोरले. महाराष्ट्राच्या टीम मध्ये अमरावती विभागातून खेळत शंतनु दळवी, प्रेम मुरकुटे, विजयराज निळे या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक प्राप्त करून शाळेचे व पालकाचे नाव उंचावले.

या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट खेळाची नोंद घेत शाळेच्या प्राचार्या जया नन्हाई, व्यवस्थापिका सुजाता कुल्ली यांनी खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक फईम सौदागर व गणेश पेरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळा समितीच्या अध्यक्षा वृषालीताई बोंद्रे व संस्थेचे अध्यक्ष क्रीडा क्षेत्रात विशेष रूची ठेवणारे माजी आ. राहुल बोंद्रे यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केले व या पुढेही असेच यश मिळत राहो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!