Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

झेडपीच्या लघु पाटबंधारे विभागाला पाच वर्षात मिळाले पाच प्रभारी अधिकारी!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – प्रभारी अधिकार्‍यावरच सध्या जिल्हा परिषदेचा डोलारा सुरू आहे. अशात आश्चर्याची बाब म्हणजे, लघु पाटबंधारे विभागाला गेल्या पाच वर्षात पाच प्रभारीच अधिकारी यांनी पदभार सांभाळला. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाला कायमचा अधिकारी कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे.

सन २०१९ या वर्षामध्ये लघु पाटबंधारे विभागाचा पदभार प्रभारी म्हणून खरात यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर सन २०२० मध्ये दांडगे, २०२१ मध्ये कदम, नंतर पंडित भोसले व आता महिद्रकर यांच्याकडे प्रभारी पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. शासनाकडून या ठिकाणी कायमच्या अधिकार्‍याची नेमणूक का करत नाही, असा प्रश्न पडला आहे. सध्या लघु पाटबंधारे विभागाचा पदभार महिंद्रकर यांनी जरी घेतला असला तरी, त्यांच्याकडे सांगोला व पंढरपूर या ठिकाणी ते कार्यरत असल्याने तोही पदभार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य लघु पाटबंधारेचा कारभार आता पुन्हा प्रभारीवरच चालणार असल्यामुळे या विभागाचे काय होणार, असा प्रश्न पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!