सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक एक सन २०२२-२३ या वर्षी संस्थेस ७३ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. त्या अनुषंगाने लाभांश व बचत ठेव व्याज असे एकूण एक कोटीचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याहस्ते ऑनलाईन वितरीत होणार असल्याची माहिती चेअरमन विवेक लिंगराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित नं. १ सोलापूर या पतसंस्थेची सन २०२२-२३ ची ८९ वी सर्वसाधारण सभा रविवार, ११ जून २०२३ रोजी शांतीसागर मंगल कार्यालय रेल्वे लाइन सोलापूर येथे होणार आहे. त्यानिमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. लाभांश वाटपाची रक्कम सभासदांच्या खात्यावर सोमवारपासून जमा होणार आहेत. पतसंस्था कर्जावर ६ टक्के दराने व्याज आकारणी करते. वसुली कमी होऊनही संस्थेने अत्यंत काटकसरीने कामकाज करून लाभांश ४.५ टक्के व बचत ठेव व्याज दर ५ टक्केनी अदा करण्यात येणार आहे.
संस्थेचे भाग भांडवल १६ कोटी ६ लाखाचे झाले आहे. बचत ठेव ६ कोटी ६४ लाख आहे. संस्था स्वभांडवली कर्ज वितरीत करते. तसेच सभासदासाठी गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याचा मानस असल्याचेही याप्रसंगी लिंगराज यांनी सांगितले. सभेच्या वेळी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. यावेळी एस.ए. चेळेकर व्हा. चेअरमन, श्रीशैल देशमुख, डी. पी. घाडगे, डी. एस घोडके, ए. बी. जगताप, एस. आर. तांबोळी, एस.यु. नागटिळक, व्ही. बी. पाटील, एस. वी. जाधव, एच. सी. सपताळे, एस. आर. भिंगे सौ. एस. व्ही. यादगिरी, सौ. एम. एस. शिंदे, टी. एम. राऊत, डी. व्ही. राठोड डॉ. एस. पी. माने तज्ञ संचालक सचिव देशपांडे, सुभाष काळे लेखनिक उपस्थित होते.