– चिखली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन
चिखली (तालुका प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील आंबेडकरी तरूण अक्षय भालेराव यांची जातीयवादी लोकांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करणार्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार चिखली यांच्यामार्फत सम्राट अशोक फुले -आंबेडकर जयंती उत्सव समिता तथा समस्त आंबेडकरी समाज बांधवांनी दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, बोंढार जि.नांदेड गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी करण्यात आली, याचा राग मनात धरून जातीयवादी मानसिकतेतून अक्षय भालेराव या आंबेडकरी तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात येऊन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे आंबेडकरी वस्तीवर दगडफेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा आंबेडकरी समाज जाहीर निषेध करीत आहे. त्याचप्रमाणे आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी, व हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी चिखली शहरातील आंबेडकरी समाज व सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष एस एस गवई, प्रशांत उदयराव भरकार, प्रा. एस. जी. राऊत, व्ही डी गवई, रमेश साळवे, समाधान भटकर, अॅड आर डी जाधव, अरुण हिवाळे, दंगमोहन कोकडे, प्रा. आर. डी. गवई, राजेंद्र सुरडकर, मिलींद भंडारे, परसराम शिंगणे, विलास जाधव, मनिष गवई, निलेश समाधान जाधव, दीपक थोरात, श्रीकांत शिनगारे सुमेध नारायण जाधव, सुशिलकुमार राऊत, दिनकर निकाळजे, विशाल खरात, प्रा. मिलींदकुमार मघाडे, संजय जाधव, प्रशांत झिने, विलास घोरपडे, इंजि. एन के सरदार, दयानंद निकाळजे, सिद्धार्थ विणकर, अॅड डी व्ही पवार, प्रशांतभैया डोंगरदिवे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
—————–