Head linesPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

कर्नाटकच्या निकालाचा सोलापूर जिल्ह्याच्या भाजप खासदार, आमदारांनी घेतला धसका!

सोलापूर (संदीप येरवडे) – नुकतेच कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली. त्यामुळे या सत्तेचे पडसाद सध्या कर्नाटकच नव्हे तर देशभरात आणि विशेषत: सोलापूर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद उमटले आहे. त्यामुळे कर्नाटकसारखी परिस्थिती महाराष्ट्र राज्य आणि सोलापूर जिल्ह्यामध्येदेखील होईल का, अशी भीती सध्या सोलापूरमधील भाजपच्या खासदार, आमदार वाटत असावी, अशी चर्चा सुरू आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करून आणि विशेषतः मोदी यांच्या जीवावर निवडून आलेल्या भाजपच्या खासदार आमदारांची झोप उडाली आहे. देशामध्ये मोदी हे पंतप्रधान असले पाहिजे, यासाठी अनेक मतदारांनी डोळे झाकून भाजपच्या येथील उमेदवाराला मतदान केले. परंतु मागील काही वर्षात येथील आमदार, खासदार हे त्यांच्याच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना विसरून गेले, असा सूर कार्यकर्ते लावत आहेत. विशेषतः निष्ठावंत कार्यकर्त्यांना येथील आमदार, खासदारांनी सांभाळले नाहीत. केवळ आपला स्वार्थ साधला असल्याचा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांमधून निघत आहे. त्यामुळे कर्नाटकची निवडणूक आणि सोलापूर जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी पाहता, आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता भाजपच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. मोदी यांच्या कार्यकाळाला ९ वर्ष पूर्ण झाले आहेत, त्या निमित्ताने सध्या भाजपचे ३० मे ३१ जूनपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये जुने व नवीन कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते व बुथ यंत्रणेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


दोन देशमुखामध्ये कार्यकर्त्यांची विभागणी!

आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख या दोन आमदारांमध्ये भाजपचे कार्यकर्ते विभागले आहेत. एका आमदाराचा कार्यकर्ता असेल तर दुसर्‍या आमदाराकडे काम घेऊन जात नाही आणि दोन्ही आमदारांचे कधीच पटले नाही. त्यामुळे भविष्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या जागा घटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!