संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
– राजकीय संघर्ष टाळण्यात प्रतापकाका ढाकणे यांना अखेर यश!
शेवगाव, जि. अहमदनगर (बाळासाहेब खेडकर) – राजकीय संघर्ष होण्याची शक्यता असलेली संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर बिनविरोध झाली असून, कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापकाका ढाकणे यांची एकहाती सत्ता कायम राहिली आहे. संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी एकूण ४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ३० जणांनी अखेरच्या दिवसापर्यंत माघार घेतल्याने सदर निवडणूक बिनविरोध पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण लोखंडे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे.
बिनविरोध झालेले नवनिर्वाचित संचालक पुढीप्रमाणे – बोधेगावं सर्वसाधारण गटातून उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, बाळू फुंदे, हातगाव सर्वसाधरण गटातून- भाऊसाहेब मुंडे, सुरेशचंद्र होळकर, अशोक तानवडे, मुंगी सर्वसाधारण गटातून- बापूराव घोडके, श्रीमंत गव्हाणे, रणजित घुगे, चापडगाव सर्वसाधारण- गटातून- शिवाजी जाधव, पांडूरंग काकडे, सदाशिव दराडे, हसनापुर सर्वसाधारण गटातून ऋषिकेश प्रतापराव ढाकणे, माधव काटे, तर उत्पादित सहकारी संस्था प्रतापराव बबनराव ढाकणे, मतदार अनुसूचित जाती जमाती मतदासंघांतून सुभाष खंडागळे, महिला राखीवमधून विद्यमान संचालिका मिना संदीप बोडखे, सुमन मोहन दहिफळे, तर इतर मागासर्गीय मतदासंघातून तुषार वैद्य, भटक्या जाती जमातीमधून त्रिंबक चेमटे, या प्रमाणे नवनिर्वाचित संचालक बिनविरोध झाले आहेत. यामध्ये ऋषीकेश ढाकणे, शिवाजी जाधव, पांडूरंग काकडे, सदाशिव दराडे, अशोक तानवडे यांना नव्याने संधी मिळाली असून, पुन्हा १४ विद्यमान संचलकाना संधी दिली गेली आहे.
ऐनवेळी हातगाव गटातून अशोक तानवडे यांचा अर्ज कायम ठेवल्याने विद्यमान संचालक विठ्ठल अभंग यांचा ऐनवेळी अर्ज मागे घेतला गेला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे व सत्ताधारी संचालक मंडळ प्रयत्नशील होते. सहकारात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीं अखेर त्यांनी यश मिळवले गेले आहे. ऊस उत्पादांना चालू गळीत हंगामाचे संपूर्ण पेमेंट अदा केले गेले असून, पुढील हंगाम व नव्याने हाती घेतलेला इथेलॉन प्रकल्प यशस्वीपणे सुरू करण्यासाठीं जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सहकारात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ऊस उत्पादक, शेतकरी व सभासद, कामगारांच्या हित जोपासण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची महिती अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी दिली, तसेच अर्ज माघार घेणारांचे त्यांनी आभार मानले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण लोखंडे यांना शेवगावचे सहाय्यक निबंधक लूनावत, गाहिणीनाथ विखे यांनी सहकार्य केले.