शेगाव पोलिसांच्या इज्जतीचे धिंडवडे; शेगावातील जुगारअड्ड्यावर आयजींच्या पथकाची धाड, ८१ जुगारी रंगेहाथ पकडले!
– आयजींच्या पथकाच्या कारवाईने बुलढाणा पोलिस हादरले!
शेगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेगावातील संग्रामपूर रोड़वरील हॉटेल गौरव येथील जुगारअड्ड्यावर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) यांच्या पथकाने छापा मारला. या कारवाईने बुलढाणा पोलिस दलाचे विशेष करून शेगाव पोलिसांचे धिंडवडे निघाले असून, बुलढाणा पोलिस हादरले आहेत. आयजींच्या पथकाने केलेल्या कारवाईत ८१ जुगारी रंगेहाथ पकड़ले असून, ११९ मोबाईल, ५० दुचाकी व चारचाकी वाहनांसह एक कोटी आठ लाख एकोणवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना काल, ३ जून रोजी संध्याकाळी घड़ली. याप्रकरणी आज, ४ जूनरोजी शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जुगारावर आयजी पथक रेड़ करत असताना जिल्ह्यातील पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. यानिमित्ताने शेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच शंका निर्माण झाली आहे. नवीन पोलीस अधीक्षक सुनील कड़ासने यांनाही काही पोलिस अधिकारी अंधारात ठेवत असल्याचे या कारवाईने चव्हाट्यावर आले आहे.
अमरावतीच्या आयजी पथकाने काल, ३ जूनरोजी शेगावातील संग्रामपूर रोड़वरील हाटेल गौरव येथील जुगारावर छापा मारला. यामध्ये प्रमोद धर्मराज सुळ रा. शेगाव, सचिन नारायण वाघमारे रा. शिवाजी चौक अकोट जि. अकोला, गोपाल भानुदास बोराड़े रा.बाळापूर जि.अकोला, विष्णू लक्ष्मण वाघ रा.मलकापूर जि.बुलढाणा, संदीप रामदास टोपरे शांतीनगर अकोला, गणेश भिमा चव्हाण, रा.सोनाळा जि.बुलढाणा, मो.असिफ मो. हनिफ नांदुरा जि.बुलढाणा, अ.अकील अ.रज्जाक आनंदनगर चिखली, शाम दशरथ भोवरे रा.घाटपुर जि.बुलढाणा, संतोष सदाशिव पाटील रा.बाळापूर जि.अकोला, रमेश तुळशिराम अंबुसकर रा. उमरखेड़ जवळा ता. शेगाव जि.बुलढाणा, भाष्कर दगड़ू पाटील रा. विष्णूवाड़ी ता.मलकापूर जि बुलढाणा, विजय मदनलाल पाड़ीया शेगाव जि.बुलढाणा, गणेश समरत इंगळे रा.सवर्णा ता.शेगाव जि.बुलढाणा, सुमित मुकुंद काटे मोताळा जि.बुलढाणा, विवेक मांगीलाल मुंदडा रामधन प्लॉट अकोला, महेन्द्र कोंड़ीराम तायड़े भीमनगर अकोला, समाधान अमृता खंड़ेराव, रा.कौलखेड़ ता.शेगाव जि. बुलढाणा, प्रदीप मधुकर पोसरकर पटवारी कॉलनी शेगाव, नीलेश प्रतापसिंह ठाकूर तेल्हारा जि.अकोला, योगेश विष्णू वाघ सगोड़ा ता.संग्रामपूर, गजानन शिवसिंग राठोड घाटपुरी ता.खामगाव जि. बुलढाणा, शे.मिर्झा शे.महंमद उजमपुरा जि.अकोला, अजहरखान जाकरखान बैदपुरा, अकोला, जाकीरशहा मदारशहा आठवड़ी बाजार तेल्हारा जि. अकोला, राजू त्र्यंबक मोरे रा.सायवणी ता.पातूर जि.अकोला, अफजलखान फिरोजखान बैदपुरा अकोला, दीपक वामन वानखडे उमरी अकोला, शकील मुल्ला गणी मुल्ला मिलींद नगर तेल्हारा जि. अकोला, सूरज संजय दामोधरे रा.आवट ता.संग्रामपूर, गौतम अर्जुन तायड़े रा.आड़सुळ ता.शेगाव जि.बुलढाणा, सागर समाधान दामोधर एकलारा बानोदा ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा, अनिल गोवर्धनदास चांड़क जूने शहर अकोला, संतोष श्रीकृष्ण दाभाड़े रा.सोनाळा ता.संग्रामपूर जि बुलढाणाा, राजहंस वासुदेव ढगे रा. जायगाव ता.शेगाव जि बुलढाणा, मधुकर श्रीराम चोखड़े रा. ओमनगर शेगाव, संजय गुलाबचंद सोगाणी माळीपूर चिखली, सिद्धार्थ फकीरा वानखडे एकलारा बानोदा ता संग्रामपूर, नथ्थु देविदास पवार शिवाजी नगर शेगाव, शे.रियाज शे.अनिज बाळापूर जि. अकोला, विनोद धर्माराज सुळ रा.धनगरनगर शेगाव, गजानन प्रल्हाद चोपड़े शेगाव, रामेश्वर वासुदेव इंगळे सवर्णा ता.शेगाव, रविंद्र काशीनाथ महाजन वाघोद ता.रावेर जि.जळगाव, संतोष नारायण दीवाले आसरा कॉलनी अकोट, अशोक नामदेव गायकवाड़ मिलींद नगर शेगाव, संजय दिनकर बढे गजानन सोसायटी शेगाव, भरत मोहन चावरे अकोट जि अकोला, राजेश सुदामराव भांड़े खेतान चौक शेगाव, देवकिशन हरिराम गोहर अकोट जि.अकोला, गणेश भिकाजी अवचार चिंचोली ता.शेगाव, बाळकृष्ण ज्ञानदेव ताले खदान अकोला, शे. हारूण शे.करीम नांदुरा जि.बुलढाणा, प्रकाश रघुनाथ शेजोळ गौलखेड़ शेगाव, संदीप ओंकार वानखडे एकलारा बानोदा ता. संग्रामपूर, हुकुमचंद गरबक्ष दंड़ोरे मलकापूर जि.बुलढाणा, ओमप्रकाश कन्हैयालाल अग्रवाल भैरव चौक शेगाव, शे.ईरफान शे.अयुब बजार फैल शेगाव, राजु सुगदेव काळे रा.वहानपुर, भागवत शालीग्राम साबे रा.भेंड़वळ ता.जळगाव जा., बिस्मील्ला खा. अखान अकबरखा फरशी शेगाव, पंकज नामदेव खिराळे व सागर सुधाकर पतंगे शिवसेना वसाहत अकोला, साबीर अजीम पटेल रा.लोहारा ता.बाळापूर जि अकोला, रविंद्र गजानन नेमाड़े व संजय मनोहर माजरे रा.ड़ोंगरगाव ता.बाळापूर जि. अकोला, निलेश सुभाष घावट लोहारा ता.बाळापूर, नामदेव शामराव माने शेगाव, शे.अजीज शे. रफीक अकोटफैल अकोला, अमुल राजेंद्र ठाकुर रा.वरवट ता.संग्रामपूर, शे.अरशद शे. दिलदार भुतबंगला शेगाव, मयुर संजय भटकर रेल्वे कॉलनी शेगाव, सोपान नारायण खिराड़े रा.कुर्हा काकोड़ा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव, तेजस मोहन गोतमारे , रा.तामगाव ता.संग्रामपूर, आत्माराम गजानन बावस्कर रा. तरोड़ा ता.शेगाव, सुबोध सुरेश लव्हाळे रा.पिंप्री कवठळ ता.संग्रामपूर, सचिन श्रीकृष्ण पाटील रा.नेपालनगर खामगाव; गोपाल संतोष ठाकरे रा.हिवराखु. ता.खामगाव, मोहन पांड़ुरंग मुंड़े रा. पिंप्री काथरगाव ता.संग्रामपूर, प्रतापसिग काशीराव राठोड शेगाव, प्रविण हरीदास हिंगणकार रा.कुर्हा काकोड़ा ता.मुक्ताईनगर जि. जळगाव आदिंना जुगार खेळताना रंगेहाथ पकड़ले व त्याच्यीजवळून ११९ मोबाईल, ५० दुचाकी व चारचाकी वाहने व रोखसह एक करोड़ आठ लाख एकोणवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी रामकृष्ण पहाड़सिंह जाधव पोलीस निरीक्षक नेर जि.यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून शेगाव पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या कामी पोलिस निरीक्षक वड़गावकर हजर होते. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण तळी हे करीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील वर्दळीच्या शेगावी संतनगरीत एवढा मोठा जुगार सुरू असताना जिल्हा पोलिसांना या बाबीची माहिती कशी काय नव्हती, याबाबत आता संशय निर्माण झालेला आहे. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कड़ासने यांनाही पोलीस दलातील काही मुरलेल्यांनी याबाबत अंधारात ठेवले असेल का? असाही प्रश्न चर्चिला जात आहे.