बुलढाणा (संजय निकाळजे) – महिलांनी घराबाहेर पडू नये अशा वातावरणात आम्ही पुढे आलो. राजकारण हे क्षेत्र तर महिलांसाठी जवळजवळ नाकारले गेले होते. मात्र सध्याचा काळ हा महिलां सक्षमीकरणासाठी, महिला चळवळीसाठी पोषक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व जुन्या पिढीतील नेत्या सौ.प्रभाताई चिंचोले यांनी केले. तीन पिढ्यातील महिलांनी हजेरी लावत यावेळी आपला स्त्रीवादी संघर्ष उलगडाला.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कार्यालयात वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभाताई चिंचोले होत्या तर डॉ. इंदुमती लहाने, प्राचार्य शाहिना पठान, सुरेखाताई खोत पद्माताई सावळे, प्रेमलता गवई, उषा भालेराव, कुसुमताई जाधव, लीलाताई शिरसाठ, वंदनाताई निकम, नलिनी धाडवे, उर्मिला दीदी आदींची उपस्थिती लाभली. पुढे बोलताना प्रभाताई चिंचोले यांनी अनुभव संचित मांडले. पूर्वी हक्कासाठी संघर्ष खूप करावा लागत असे. त्यात महिला घराबाहेर पडत नसत. ज्या पडल्या त्यांना नावे ठेवली जात. परंतु अशा काळातही ,काही महिलांनी बाहेर पडून संघर्ष केला. लोकनेत्या अहिल्याबाई होळकर यांनी तर इतिहासात कितीतरी आधी राज्यकारभार चालूवुन महिला सक्षमीकरणाला गती दिल्याचे सांगून महिलांनी अहिल्या बनून पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रसंगी शाहिनाताई पठाण व इतरांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे नियोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ शोन चिंचोले, सचिव सुनील सपकाळ ,प्रा. अनिल रिंढे, रणजितसिंग राजपूत आदींनी केले.
५० सुवर्ण पदकांची मानकरी ही महिलाच!
बुलढाण्यातील कामिनी मांमर्डे या महिलेने देश विदेशातील खाडीमध्ये पोहोण्याचा विक्रम केला. पन्नास सुवर्णपदकांच्या त्या मानकरी असल्याने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या महिलांनी उत्तुंग झेप घेतली आहे त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. वय वर्ष ऐंशी – वय वर्ष साठ व नवीन पिढीतील महिला असे तीन पिढ्यांतील महिलांनी हजेरी लावून आपला महिला सक्षमीकरणातील संघर्ष उलगडला.
यांचाही झाला सन्मान…
डॉ सुलोचना वानरे, स्नेहलता मानकर, वैशाली पडघान, डॉ अस्मिता चिंचोले, अंजली परांजपे, पूजाताई गायकवाड, जयश्रीताई शेळके,विजयाताई काकडे, प्रतिभाताई भुतेकर,सुरेखा सावळे, नंदिनी टारपे,नंदिनी रिंढे, अनिता कापरे, अलका खांडवे, वैशाली राजपूत, वैशाली ठाकरे, स्वाती लड्डा,स्नेहल कदम, नजीमा खान, कोमलताई झंवर,डॉक्टर वंदना ढवळे ,वंदना काकडे, किरण ताई टाकळकर, कीर्तीताई पराड अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र व बुके देऊन करण्यात आला. प्रसंगी १२० महिलांना सन्मानित करण्यात आले.