– घरी जावून केलेल्या सत्काराचे समाधान वेगळेच – प्राचार्य खोरखेड़े
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल २ जूनरोजी जाहीर झाला. यामध्ये मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील सरस्वती विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९०.५६ टक्के लागला आहे. शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीत क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षक व प्रतिष्ठीतांनी आज, ३ जूनरोजी घरी जाऊन सत्कार केला. हुशार व गुणवान मुलांचा घरी जाऊन सत्कार केल्याने इतरांना प्रेरणा मिळते शिवाय याचे समाधानही वेगळेच मिळते, असे यावेळी प्राचार्य अशोक खोरखेड़े यांनी सांगितले. तसेच, या भावपूर्ण सत्काराने गुणवंत विद्यार्थी व त्यांचे आई-वडिलही भारावून गेले होते.
देऊळगाव साकरशा येथील सरस्वती विद्यालयाचे ५३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ होते. यामधील ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम प्रतिक गजानन ढवळे ९० टक्के, द्वितीय कुणाल विलास वानखड़े ८७.२० टक्के तर तृतीय क्रमांक कृष्णा घनशाम गायकवाड़ ८५.६० टक्के असे गुण मिळाले आहेत. शिवाय, विशेष प्राविण्य एक, प्राविण्यश्रेणी दहा, प्रथम श्रेणी १३, द्वितीय १९ तर पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९०.५६ टक्के लागला आहे. यामध्ये शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सरपंच संदीप अल्हाट, पोलीस पाटील गजानन पाचपोर, सरस्वती शिक्षण संस्थेचे संचालक रितेश दुगड़, प्राचार्य अशोक खोरखेड़े, वर्ग शिक्षक सुनिल पाचपोर, शिक्षक सर्वश्री दुतोंड़े, पुरूषोत्तम चवरे, पाटील, लिपीक गजानन बलांसे, साळुबा फोलाने, रतन पवार यांच्यासह इतरांनी गुणवान विद्यार्थ्यांचा घरी जाऊन आज सत्कार केला. या सत्काराने इतरांना प्रेरणा तर मिळतेच शिवाय अशा सत्काराचे वेगळेच समाधान मिळते, असे यावेळी प्राचार्य अशोक खोरखेड़े यांनी सांगितले.
येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाही शंभर टक्के लागला असून, ४८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते. यामधील विशेष प्राविण्य एक, प्रथम श्रेणी २४, द्वितीय २० तर तृतीय श्रेणीत तीन विद्यार्थी आले आहेत. यामध्ये शाळेतून प्रथम निकीता गुलाब वानखडे ८०.६७, द्वितीय कु.ज्ञानेश्वरी ठक तर तृतीय लक्ष्मी हरमकार ना.देशमुख आली आहे. सदर विद्यार्थ्याचाही प्राचार्य अशोक खोरखेड़े, सरपंच संदीप अल्हाट, तंटमुक्ती समिती अध्यक्ष बी.एम.राठोड, पोलीस पाटील गजानन पाचपो, संस्था संचालक रितेश दुगड़, वर्गशिक्षक देशमुख, शिक्षक दुतोंड़े, पुरूषोत्तम चवरे, पाटीलसह शिक्षक व गावकरी उपस्थित होते. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सरस्वती शिक्षण संस्था पदाधिकारी व गावकर्यांनी कौतुक केले आहे.
माहे जुलै ते मार्चदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वर्षभर सामान्यज्ञान परीक्षा घेतल्या जातात, शिवाय वर्षभर उत्कृष्ट परिपाठ घेतल्या जातो. विद्यार्थी दररोज शाळेत आई-व़डिलांना नमस्कार करून येतात, तसेच प्रायोगिक तत्वावर इयत्ता ११ व बारावीसाठी वाचन तासिकासह विविध उपक्रम शाळेत सुरू केल्याचे प्राचार्य अशोक खोरखेड़े यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.