LONARMEHAKARVidharbha

बिबी येथे स्व. गोपीनाथराव मुंडे पुण्यतिथी साजरी

बिबी, ता. लोणार (प्रतिनिधी) – लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी बिबी येथे साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील बसस्थानक परिसरात सर्व समाजाच्या ग्रामस्थांनी स्व. मुंडे यांना विनम्र अभिवादन करत आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी विविध मान्यवरांचीदेखील उपस्थिती होती.

स्व. मुंडेसाहेबांनी तळागाळातल्या समाजासाठी केलेल्या भव्यदिव्य कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व समाजबांधव याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी बसस्थानक परिसरात भव्य स्टेज उभारले गेले होते. स्टेजवर स्व. गोपीनाथराव मुंडे यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. विविध मान्यवरांच्या हस्ते या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बिबी गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर असोशियन, व्यापारीवर्ग, पोलीस स्टेशन कर्मचारीवर्ग, महावितरण व बँक कर्मचारी अशा विविध क्षेत्रातून सामाजिक कार्यकर्ते, बचत गट, तसेच तरुण मंडळी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मुंडेसाहेबांना आदरांजली अर्पण केली.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!