– काही महिन्यातच फाटा वस्तीवर मिळणार घरोघरी पाणी – सरपंच सौ. अनिताताई वायाळ
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – मेरा बुद्रूक येथील फाटा वसतीवरील नळयोजनेचा नारळ तब्बल २५ वर्षानंतर फुटला असून, आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या शिफारशीने या जलयोजनेसाठी तब्बल एक कोटी ३७ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. काही महिन्यातच घरोघरी पाणी मिळेल, अशी ग्वाही सरपंच सौ. अनिताताई वायाळ यांनी दिले आहे.
मेरा बुद्रूक येथील मेरा बुद्रूक फाटा वस्तीवर १९९५ पासून ते २०२३ पर्यंत सरकारी नळ योजना नसल्याने ग्रामस्थांनी स्वखर्चाने पाईपलाईन करून विहीर मालकांकडून नळ कनेक्शन घेतले तर काहींनी बोरवेल घेऊन पाण्याची समस्या भागवली होती. अनेक वर्षापासून सरकारी नळ योजनेची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गजानन वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा बुद्रूक ग्रामपंचायतचा कारभार सौ. अनिताताई वायाळ या सांभाळत असतानाच मेरा बुद्रूक फाटा वस्तीवरील पाण्याची समस्या कायमची मिटवावी, यासाठी मेरा बुद्रुक ग्रामपंचायच्या सरपंच झाल्यापासून त्यांची तळमळ होती.
गजानन वायाळ यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून मेरा बुद्रूक गावापासून मेरा फाटा वस्तीपर्यंत पाईपलाईन व टाकी मंजूर करून पंचवीस वर्षापासून जी पाणी समस्या होती ती मिटवण्याचा प्रयत्न केला व पाईपलाईनचे प्रत्यक्षात फाटा वस्तीवर काम चालू झाले. सरकारी नळ योजनेचे प्रत्यक्षात काम चालू झाल्यामुळे मेरा बुद्रुक फाटा वस्ती वरील ग्रामस्थांनी मेरा बुद्रुक सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार व्यक्त करत, कायमची पाणी समस्या मिटणार असल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तब्बल २५ वर्षानंतर या पाणी योजनेचा नारळ फुटल्याने ग्रामस्थांत आनंद ओसांडून वाहात होता.
मेरा बुद्रूक फाटा वस्तीवरील विकास कामासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व येणार्या तीन-चार महिन्यात सर्वांना नळ योजनेचे मुबलक पाणी मिळेल.
– सौ.अनिताताई वायाळ, सरपंच मेरा बुद्रूक
————–