BULDHANAHead linesMumbai

प्लॅन्ट्रा केम प्रा. लि.च्या विस्तारीत प्रकल्पाचे माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते सोमवारी मुंबईत उद्घाटन

– मुंबईतील पाताळगंगा एमआयडीसीत दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रम, अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील मिसाळवाडीचे भूमिपुत्र उद्योजक बळीराम मिसाळ यांनी रसायनिक उद्योग क्षेत्रात स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांनी स्थापन केलेल्या प्लॅन्ट्रा केम प्रा. लि. कंपनीच्या मुंबईतील पाताळगंगा एमआयडीसीतील विस्तारीत उद्योग प्रकल्पाचे सोमवारी (दि.२९) रोजी दुपारी १२ वाजता माजी मंत्री तथा आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद््घाटन होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांची मांदियाळी मुंबईतील पाताळगंगा एमआयडीसीत जमणार आहे.

मिसाळवाडी गावाने विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारे भूमिपुत्र दिले असून, हे भूमिपुत्र समाज व देशाला आपआपल्या क्षेत्रात पुढे नेण्याचे काम करत आहेत. उद्योजक बळीराम मिसाळ यांनीदेखील शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आपल्या कठोर परिश्रमांनी मुंबईसारख्या उद्योग क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले आहे. रसायनिक उद्योगात त्यांचे अग्रक्रमाने नाव घेतले जात आहे. त्यांनी स्थापित केलेल्या प्लॅन्ट्रा केम प्रा. लि. कंपनीच्या पाताळगंगा एमआयडीसीतील विस्तारीत प्रकल्पाचे माजी मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते उद््घाटन नियोजीत आहे. याप्रसंगी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजीव भगवानराव जावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. विकास मिसाळ, बाजार समितीचे संचालक कृष्णा मिसाळ, बुलढाणा कोषागारचे सहाय्यक संचालक दिनकर बावस्कर, ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपचे अध्यक्ष तथा साधना न्यूज टीव्हीचे कार्यकारी संपादक पुरूषोत्तम सांगळे, मिसाळवाडीचे सरपंच बाळा पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ, माजी सरपंच देवीदास मिसाळ, मिसाळवाडीचे प्रगतशील शेतकरी अशोक पाटील, प्रकाश पाटील, कनेक्टीव्ह लाईव्ह फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सौ. वैशालीताई चेके (मुंबई), समाजसेविका सुनीताताई देवीदास हांडे पाटील (नवी मुंबई), शिवसेना (ठाकरे) उपजिल्हाप्रमुख आत्माराम सणस (घनसोली), विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक प्रवीण मिसाळ,  आदर्श शिक्षक नीलेश मिसाळ, मिसाळवाडीचे पोलिस पाटील रवी मिसाळ, माजी मुख्याध्यापक विष्णू मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य अनिल काकडे, संतोष भगत, काशिनाथ सुरडकर, शिवशंकर मिसाळ, अण्णा मिसाळ, मनोहर मिसाळ, नवनाथ मिसाळ, संजय काकडे, सारंग भगत, दशरथ मिसाळ, सुनील मिसाळ,  कैलास मिसाळ, योगेश मिसाळ, सेवानिवृत्त सहाय्यक लेखाधिकारी सुधाकरराव सपकाळ, सिद्धांत एरिगेशनचे पंजाबराव अरमाळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. विशेष बाब म्हणजे, या प्रोजेक्टचे सर्व बांधकाम हे मिसाळवाडीचे भूमिपुत्र तथा प्रसिद्ध कंत्राटदार, ओम साई एण्टरप्राईजेस मुंबईचे सर्वेसर्वा प्रताप मिसाळ यांनी केलेले आहे. या कार्यक्रमाला आवर्जुन यावे, असे निमंत्रण उद्योजक बळीराम मिसाळ, मुख्याध्यापक चंद्रभान मिसाळ यांच्यासह मिसाळवाडी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आलेले आहे.


विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मिळाल्यात शुभेच्छा!

मिसाळवाडीचे भूमिपुत्र बळीराम मिसाळ यांच्या विस्तारीत उद्योग प्रकल्पाच्या शुभारंभानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते धृपतराव सावळे पाटील, माजी आमदार तथा ज्येष्ठ नेत्या सौ. रेखाताई पुरूषोत्तम खेडेकर, बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष प.पू. आर. बी. मालपाणी, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे, शिवसेनेचे (ठाकरे) संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, खामगावचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धनदादा सपकाळ, सिंदखेडराजाचे माजी आ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी आदींसह विविध मान्यवरांनी या प्रकल्पाच्या शुभारंभासाठी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!