चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – चिखलीतील प्रसिद्ध व्यापारी व भाजपचे कार्यकर्ते स्वप्निल गुप्ता यांची स्कॉर्पिओ गाडी काल (दि.२०) कुणी तरी जाळली होती. या प्रकरणी गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी नयन विलासअप्पा बोंद्रे यांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू होती. दरम्यान, या घटनेला राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२० मेच्या मध्यरात्री घरामागे उभी करण्यात आलेली भाजप कार्यकर्ते व व्यापारी स्वप्निल गुप्ता यांची स्कॉर्पिओ अज्ञात आरोपीने जाळली होती. याप्रकरणी गुप्ता यांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हेही दाखल केले होते. गुप्ता यांच्या तक्रारीनुसार, घराशेजारी राहणारे नयन विलासअप्पा बोंद्रे यांनीच खोडसाळपणे गाडी जाळल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, गाडीमध्ये साडेचार लाख रूपये रोख रक्कम होती, असेही तक्रारीत नमूद होते.
गाडी जाळण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेला होता. गुप्ता यांच्या तक्रारीवरून सीसीटीव्ही फुटेज पाहाता, चिखली पोलिसांनी नयन विलासअप्पा बोंद्रे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू होती. चौकशीअंती बोंद्रे यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेला राजकीय वळण मिळण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.
————–