CrimeLONARVidharbha

भरधाव ट्रकने वृद्धास उडविले, जागीच ठार

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धास भरधाव ट्रकने उडविल्याने झालेल्या भीषण अपघातात ओंकार दगडू इंगळे (वय ७५) रा. चिखला काकड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने चिखला काकड गावावर शोककळा पसरली होती. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला बिबी पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर असे, की आज, दि.२० मेरोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी उद्धव ओंकार इंगळे रा. चिखला ह. मुक्काम बिबी व्यवसाय (कोतवाल) यांनी बिबी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील ओंकार दगडू इंगळे रा. चिखला काकड, वय ७५ वर्ष हे रोडने पायी शेतात जात असताना, बिबी ते मेहकर रोडवर गुलाब पेट्रोल पंपाजवळ मेहकरकडून येणार्‍या टाटा ट्रक क्रमांक एमएच- ३४ बीजी ७१४४ चा चालक कोमल अनिल चव्हाण राहणार पोहरादेवी, जिल्हा वाशिम याने त्याच्या ताब्यातील ट्रक हा रोडवर भरधाव व निष्काळजीपणे चालवून रोडने पायी जाणारे ओंकार दगडू इंगळे यांना समोरून ठोस मारून व अपघात करून ओंकार दगडू इंगळे यांच्या मरणास कारणीभूत ठरला. तरी आरोपीवर कारवाई व्हावी, अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन बिबी येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. दिनेश चव्हाण हे करीत असून, सदर गुन्ह्याच्या तपासात अपघातामध्ये मरण पावलेल्या मृतक ओंकार दगडू इंगळे यांच्या प्रेतावर ग्रामीण रुग्णालय बिबी येथे शवपरीक्षण करून प्रेत अंत्यविधीकरिता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याचा घटनास्थळ पंचनामा करण्यात आला असून, गुन्ह्यातील ट्रक व चालक कोमल अनिल चव्हाण रा. पोहरादेवी जि. वाशिम यास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!