Breaking newsHead linesWorld update

कर्नाटकात भाजपचा बाजार उठला!

– कर्नाटकातून घालवले, आता महाराष्ट्रातूनही घालवू, उद्धव ठाकरे कडाडले!
– कर्नाटकांत द्वेषाचा बाजार बंद झाला, राहुल गांधी यांची मोदींवर जोरदार टीका
– देवेंद्र फडणवीसांनी भाजपचा प्रचार केला, अनेक जागांवर जोरदार पराभव

बेंगळुरू (प्रतिनिधी) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा जोरदार पराभव झाला असून, काँग्रेसने बहुमत प्राप्त करत सत्ता हस्तगत केली आहे. काँग्रेसने 136 जागांवर विजय प्राप्त केला होता. तर भाजपला केवळ 65 जागा मिळाल्या होत्या. कर्नाटकी जनतेने द्वेषाचा बाजार मांडणार्‍या भाजपचा चांगलाच बाजार उठविला होता, त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र डागले. येथील जनतेने द्वेषाचा बाजार बंद केला आहे, व प्रेमाला स्वीकारले आहे. काँग्रेसच्या विजयाबद्दल त्यांनी मतदारांना धन्यवाद दिले आहेत. दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील भाजपवर जोरदार निशाणा साधला. कर्नाटकातून हाकलले आता महाराष्ट्रातूनही हाकलून लावू, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस गेले होते. तरीदेखील भाजपचा जाेरदार पराभव झाला आहे. मुख्यमंत्री बोम्मई व भाजप नेते बीएस येदियुरप्पा यांनी पराभव स्वीकारला असून, हार-जीत भाजपसाठी नवी नाही, आम्ही पुन्हा मोठ्या ताकदीने उभे राहू, असे हे नेते म्हणालेत. तर काँग्रेसचा हा विजय जनतेचा विजय आहे. जनतेने भ्रष्ट सरकारला घरी पाठवले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे आम्ही लोकांची मने जोडण्यात यशस्वी झालो आहोत, असेही खारगे यांनी सांगून, विजयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. काँग्रेसने एकहाती सत्ता राखल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. डी.के.शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना दिल्ली हायकमांडने दिल्लीत बोलावले आहे.


विजयाची चाहुल लागताच काँग्रेस अलर्ट, मतमोजणी केंद्रातून करणार आमदारांचं एअरलिफ्ट; 15 हेलिकॉप्टर सज्ज

काँग्रेसच्या विजयाची शक्यता निर्माण होताच हायकमांड पूर्णपणे सक्रिय झालं आहे. काँग्रेसच्या आमदारांना आजच बंगळुरूला पोहोचण्यास सांगितले आहे. आमदारांना एकत्र करण्यासाठी विविध ठिकाणांहून काँग्रेस आमदारांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रातूनच आमदारांना थेट मुख्यालयात नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपला त्यांच्याशी अजिबात संपर्क साधता येणार नाही. मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तैनात आहेत. एकही आमदार कोणत्याही परिस्थितीत तुटू नये यासाठी काँग्रेसची संपूर्ण योजना आधीच तयार आहे.


कर्नाटक विजयाचे शिल्पकार ठरलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी या विजयाबद्दल जनतेला धन्यवाद दिले आहेत. भाजपने आपल्याला जेलमध्ये पाठवले, चौकश्या लावल्या, मला आजही सोनियाजी गांधी मला जेलमध्ये भेटायला आल्याचे आठवून डोळ्यात आश्रू येतात, पण कर्नाटकी जनतेने बाहेरच्यांना त्यांच्या घराचा रस्ता दाखविला आहे. आम्ही कट्टर कर्नाटकी असून, हा जनतेचा विजय आहे, असे शिवकुमार म्हणाले. राज्यभर काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. आताच्या ताज्या आकडेवारीनुसार, काँग्रेस 136, भाजप 65, जनता दल सेक्युलर 19 व कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. २०१८ पेक्षा ५६ जागा काँग्रेसला जास्त मिळालेल्या आहेत.


डी के शिवकुमार १ लाखांनी विजयी; अश्रु अनावर

कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे १ लाखं मतांनी विजयी झाले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रु अनावर झाले. आम्ही 130 जागांचा आकडा पार करू, हा काँग्रेसचा मोठा विजय आहे. कर्नाटकातील लोकांना बदल हवा होता कारण ते भाजप सरकारला कंटाळले होते. भाजपने ऑपरेशन लोटसवर पैसा खुप खर्च केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा फायदा झाला. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!