Head linesPachhim MaharashtraPune

प्रदीप कुरुलकरच्या शेअरिंगमध्ये पाकिस्तानातील ईमेल, फोटो, व्हिडिओ, फाईल्स!

पुणे (विशेष प्रतिनिधी) – पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना भारतातून लष्कराशी संबंधीत अत्यंत महत्वाची व गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून पुण्यातील संरक्षण विभागामधील (डीआरडीओ) शास्त्रज्ञ व संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याला अटक केल्यानंतर दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १५ मेपर्यंत एटीएसची कोठडी सुनावली आहे. कुरूलकर याने पाकिस्तानी हस्तक तरूणीला इ-मेल, व्हाटसअपच्या माध्यमातून लष्कराशी संबंधीत फारच महत्वाची माहिती पाठवून देशाची गद्दारी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा कुरूलकर रा. स्व. संघाच्या विचारधारेशी निगडीत होता, अशी माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

प्रदीप कुरुलकर याच्या ईमेल देवाण – घेवाणीत आढळलेले संशयास्पद ईमेल पाकिस्तानातील असल्याचे तपासातून पुढे आले आहे. तसेच त्यांच्या सोशल मीडियाद्वारे फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स शेअर झाल्याचे दहशतवादविरोधी पथकाने न्यायालयात सांगितले. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आज डॉ. कुरुलकर याला १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुरुलकर हा सहा देशात शासकीय कामासाठी गेला होता. तो तिथे कोणा कोणाला भेटला, त्याला डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये भेटायला आलेल्या महिला कोण, याचा तपास करायचा आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांकडून कुरुलकर याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे.


मोबाईलमधील डेटा डिलीट!

प्रदीप कुरुलकर याने त्याच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटा त्यांनी डिलीट केला आहे. तो डेटा नक्की काय होता आणि तो त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर विभागाला दिला आहे का? याचा तपास करण्याची गरज असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. तपास कामासाठी १५ मेपर्यंत ते एटीएसच्या ताब्यात राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!