BULDHANAHead linesLONARVidharbha

भरधाव कार ट्रकला पाठीमागून धडकली; एक ठार, चौघे गंभीर जखमी

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आजदेखील भरधाव स्वीफ्ट कारने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले होते.

भरधाव असलेली स्वीफ्ट कार क्रमांक एमएच १२ एचव्ही ०७६७ ही नागपूरच्या दिशेने भरधाव जात असताना, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार समोरील ट्रकवर पाठीमागून जोरात धडकली. जालना ते मेहकरदरम्यान मांडवा शिवारात सकाळी ८ वाजता हा भीषण अपघात झाला. या अपघातात मििंलद लक्ष्मण शिंदे (रा. चिंचगाव, ता. नेर, जि. यवतमाळ) हा जागीच ठार झाला असून, इतर चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बिबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले होते.

या घटनेची बिबी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, चालक भरत लक्ष्मण शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एपीआय सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख हे करत आहेत. या कारमधून तिघे शिंदे बंधू प्रवास करत असल्याची माहिती हाती आली आहे. चालकासह इतर बंधू जखमी आहेत.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!